Novak Djokovic says I have a lot of tennis left in me, suggestive statement at press conference avw 92 | Loksatta

नोवाक जोकोविच म्हणतो माझ्यात बरेच टेनिस अजून शिल्लक आहे, पत्रकार परिषदेत सूचक विधान

अजून बरेच टेनिस शिल्लक आहे माझ्यात असे नोवाक जोकोविचने तेल अवीव खुल्या टेनिस स्पर्धा खेळण्याकरिता आलेला असताना त्याने पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.

नोवाक जोकोविच म्हणतो माझ्यात बरेच टेनिस अजून शिल्लक आहे, पत्रकार परिषदेत सूचक विधान
सौजन्य-ट्विटर

रॉजर फेडरर नंतर जोकोविचच्या निवृतीची चर्चा सुरु झाली आहे. तो मूळचा सर्बियाचा असून त्याने आतापर्यंत २१ ग्रँडस्लॅम जिंकले आहे. “अजून बरेच टेनिस शिल्लक आहे”, असे म्हणत नोवाक जोकोविच याने आपण इतक्यात टेनिसविश्वातून निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इस्रायलची राजधानी तेल अवीव येथे खुल्या टेनिस स्पर्धा खेळण्याकरिता आलेला असताना त्याने पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले.

पत्रकारांशी संवाद साधताना जोकोविच पुढे असं म्हणतो की,” मी जरी या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन आणि यूएस ओपन स्पर्धेत सहभागी झालो नसलो, तरी माझ्यात अजून बरेच टेनिस शिल्लक असून माझ्यात टेनिस खेळायची बरीच भूक अजूनही बाकी आहे. मी टेनिस खेळताना बरेच काही साध्य केले असले, तरी मला अजून टेनिस खेळायचे आहे. त्याने एटीपी टूरशी संवाद साधताना वरील वक्तव्य केले आहे.

तसेच जोकोविचने रॉजर फेडररच्या निवृत्तीवरसुद्धा भाष्य केले असून, ‘‘रॉजरने आतापर्यंत टेनिस खेळाला बरेच काही दिले असून तो जगातील सर्वांत यशस्वी आणि आदरणीय खेळाडूंपैकी एक आहे. रॉजरची निवृत्ती ही संपूर्ण टेनिस विश्वासाठी दुःखदायक घटना असल्याचेही जोकोविच म्हणाला. जोकोविचने कोविड प्रतिबंधक लस घेतली नसल्याने तो २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन आणि यूएस ओपन टेनिस स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जपान ओपन सुपर स्पर्धेतील कामगिरीने एचएस प्रणोय जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुन्हा पहिल्या १५ मध्ये

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2022: आजपासून सुपर-१६ लढतींचा थरार, पाहा सर्व सामन्यांचे वेळापत्रक
FIFA World Cup 2022: ब्राझीलला हरवून कॅमेरूनने रचला इतिहास, तर स्वित्झर्लंड प्री-क्वार्टर फायनलमध्ये दाखल
Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स
Sunil Gavaskar: १३ हजार धावा करताना केवळ या दोन गोष्ठी ठेवल्या लक्षात सुनील गावसकरांनी त्यामागील सांगितले रहस्य
IND vs NZ 3rd ODI: “सूर्यकुमार चेज मास्टर बनू शकत नाही कारण…”, खराब प्रदर्शनानंतर चाहते भडकले

व्हिडिओ

ताज्या बातम्या
शेजारी बसलेल्या शाहरुख खानला ओळखू शकली नाही ‘ही’ अभिनेत्री; नेटकरी म्हणाले…
विश्लेषण: फिफा वर्ल्ड कपमध्ये मोरोक्को, जपान बलाढ्य युरोपिय देशांपुढे आपापल्या गटांत अव्वल कसे राहिले?
“मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजुला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा…”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
प्लास्टिकचा कचरा द्या आणि मोफत चहा प्या! उदयपूरच्या युवकाचा स्वच्छतेसाठी भन्नाट उपक्रम; पाहा Video
बांगलादेशी आणि रोहिंग्यांबद्दलचं वक्तव्य परेश रावल यांना पडलं महागात; माफी मागूनही तक्रार दाखल