भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ या संघांमधली ५ अनौपचारिक सामन्यांची मालिका नुकतीच संपली. या मालिकेत भारत अ संघाने ४-१ ने बाजी मारली. अखेरच्या वन-डे सामन्यात भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनने धडाकेबाज खेळी करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. संजू सॅमसनने ४८ चेंडूत ९१ धावा तडकावल्या. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. सॅमसनच्या या खेळीनंतर भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंहने सॅमसनच कौतुक करत, भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर संजू योग्य पर्याय असल्याचं म्हटलं.

हरभजन सिंहच्या या मतावर गौतम गंभीरनेही आपलं मत देत, संजू आता चंद्रावरही फलंदाजी करु शकतो अशा शब्दात त्याचं कौतुक केलं.

१५ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टी-२० भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून संजू सॅमसनला मात्र या संघात स्थान देण्यात आलेलं नाहीये.

अवश्य वाचा – संजू सॅमसनचं आदर्शवत पाऊल, सामन्याचं मानधन दिलं मैदानातील कर्मचाऱ्यांना दान