न्यूझीलंड संघाने युएईचा पराभव करत टी-२० विश्वचषक २०२६ मधील सलग दुसरा विजय नोंदवला. न्यूझीलंडच्या सलीमीवीरांनी किवी संघाला एकही विकेट न गमावता १० विकेट्सने एकतर्फी विजय मिळवून दिला. युएईचे गोलंदाज फिन एलन व टीम सेफर्टच्या गोलंदाजीसमोर निष्प्रभ दिसत होते.

न्यूझीलंड व युएई यांच्यातील सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झाला. न्यूझीलंडने युएईला पराभूत करत टी-२० विश्वचषकातील पहिला ऐतिहासिक विजय मिळवला, आजवर न्यूझीलंडने १० विकेट्स राखून कधीच विजयाची नोंद केली नव्हती. तर हा ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी फिन एलन व टीम सेफर्ट यांनी विक्रमी भागीदारी रचली.

युएईने दिलेल्या १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता सहज सामना आपल्या नावे केला. यादरम्यान टीम सेफर्ट २३ चेंडूत अर्धशतक तर फिन एलनने २६ चेंडूत अर्धशतक झळकावलं. यासह दोघांनी ९२ चेंडूत १७५ धावांची विक्रमी भागीदारी रचली. टीम सेफर्टने ४२ चेंडूत १२ चौकार व ३ षटकारांसह ८९ धावा केल्या. तर फिन एलनने ५० चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांसह ८४ धावांची खेळी साकारली. यासह संघाने १५.२ षटकांत सहज विजयाची नोंद केली.

युएईने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यासह युएईच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत १७३ धावांची चांगली धावसंख्या उभारली. संघाचा सलामीवीर अर्यांश शर्मा ८ धावांवर झेलबाद झाला. पण कर्णधार मुूहम्मद वसीम नाबाद राहत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेलं. वसीने ३४५ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांची खेळी केली. तर अलिशान शर्फूने ४७ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली. तर खालच्या फळीत मयंक कुमारने २१ धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने २ विकेट्स घेतल्या तर जेकब डफी, लॉकी फर्ग्यूसन आणि मिचेल सँटरन यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.