NZ vs AFG Highlights, T20 WC 2026 Match 3: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करत ५ विकेट्सने सामना जिंकला. या विजयासह न्यूझीलंडने गुणतालिकेत २ गुण मिळवत खातं उघडलं आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मधील पराभवाचा बदला न्यूझीलंडने या विजयासह घेतला. न्यूझीलंडकडून रन चेसमध्ये टीम सेफर्ट व ग्लेन फिलिप्स यांनी उत्कृष्ट भागीदारी रचली. तर मिचेल व सँटनरने अखेरीस संघाला विजय मिळवून दिला.
NZ vs AFG Highlights T20 World Cup 2026: न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्याचे हायलाईट्स
न्यूझीलंडचा अफगाणिस्तानवर ऐतिहासिक विजय, वर्ल्डकपमधील 'त्या' पराभवाचा किवींनी घेतला बदला
मार्क चॅपमन झेलबाद
न्यूझीलंड संघाला विजयासाठी ३० चेंडूत ३० असं समीकरण असताना मार्क चॅपमन मोठा फटका खेळत १६व्या षटकात झेलबाद झाला.
टीम सेफर्टचं अर्धशतक अन् झेलबाद
मोहम्मद नबीच्या १३व्या षटकात षटकारासह टीम सेफर्टने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. नबीच्या षटकात त्याने पहिल्या चार चेंडूवर १६ धावा कुटल्या. यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला आणि अफगाणिस्तानला मोठी विकेट मिळाली. सेफर्ट ४२ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह ६२ धावा करत बाद झाला. आता न्यूझीलंडला विजयासाठी ४३ चेंडूत ५९ धावांची गरज आहे.
रशीदच्या खात्यात मोठी विकेट
रशीद खानने १०व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सला क्लीन बोल्ड केलं. रशीदच्या चेंडूवर फिलिप्स षटकार खेचण्यासाठी गेला आणि बॅटची कड घेत चेंडू विकेटवर आदळला. यासह रशीदने ७४ धावांची भागीदारी तोडली आणि आक्रमक सेलिब्रेशन केलं. यासह न्यूझीलंडने १० षटकांत ३ बाद ९२ धावा केल्या आहेत.
पहिल्या षटकात ३ चौकार मारत शानदार सुरूवात केल्यानंतर दुसऱ्याच षटकात न्यूझीलंड संघाला धक्का बसला. मुजीब उर रहमानने दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर फिन एलनला क्लीन बोल्ड केलं. तर दुसऱ्या चेंडूवर त्याने रचिन रवींद्रला क्लीन बोल्ड करत सलग दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतली.
अफगाणिस्तानची उत्कृष्ट फटकेबाजी
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत चांगल्या स्ट्राईक रेटने शानदार धावसंख्या उभारली. गुलबदिन नायबचं वादळी अर्धशतक आणि खालच्या फळीतील फलंदाजांच्या फटकेबाजीच्या बळावर अफगाण संघाने ५ बाद १८१ धावा केल्या आहेत. यासह न्यूझीलंड संघाला विजयासाठी १८२ धवांच लक्ष्य दिलं आहे.
मॅट हेन्नीने येताच मिळवली विकेट
१९वं षटक टाकण्यासाठी मॅट हेन्री आला आणि पहिल्या चेंडूवर दारविश रसूली फ्लॅट शॉट खेळताना झेलबाद झाला. आतापर्यंत अफगाणिस्तानने ४ बाद १६४ धावा केल्या आहेत.
गुलबदिन झेलबाद
१८वं षटक टाकण्याची जबाबदारी रचिन रवींद्रला देण्यात आली. त्याच्या पहिल्या चेंडूवर गुलबदिनने षटकार लगावला, यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. गुलबदिन ३५ चेंडूत ४ षटकार व ३ चौकारांसह ६६ धावांची खेळी केली.
अफगाणिस्तानच्या १५० धावा
अफगाणिस्तानने १७ षटकांत १५० धावांचा पल्ला गाठला आहे. गुलबदिनने चौकार-षटकारांची आतिषबाजी कायम ठेवली असून दारविश रसुलीने त्याला चांगली साथ दिली आहे.
गुलबदिन नायबचं अर्धशतक
गुलबदिन नायबचं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत वादळी अर्धशतक झळकावलं आहे. गुलबदिनने २९ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं आहे. तर पुढच्याच चेंडूवर सेदिकुल्ला अटल १५व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला.
अफगाणिस्तान १०० पार
सेदिकउल्ला अटल आणि गुलबदिन नायब यांनी ६६ धावांची उत्कृष्ट भागीदारी रचत संघाला १०० पार नेलं आहे. गुलबदिनने १३व्या षटकात चौकार-षटकारांच्या मदतीने १८ धावा कुटल्या. यासह १३ षटकांत अफगाणिस्तानने २ बाद ११० धावा केल्या आहेत.
लॉकी फर्ग्युसन सहावं षटक टाकण्यासाठी आला आणि सामन्याचा रोख बदलला. पहिल्याच चेंडूवर इब्राहिम झाद्रान झेलबाद झाला. तर अखेरच्या चेंडूवर गुरबाज क्लीन बोल्ड झाला. यासह ६ षटकांत संघाने २ बाद ४४ धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडच्या खेळाडूंची धडक
तिसऱ्या षटकात मॅट हेन्नीच्या गोलंदाजीवर गुरबाज मोठा फटका खेळायला गेला, पण चेंडू हवेत उंच उडाला, यष्टीरक्षक, फिन एलन, मिचेल एकाच दिशेने धावले. किपर झेल टिपणार तितक्यात एलनचा धक्का लागला आणि दोघेही पडले आणि झेलही सुटला. ३ षटकांत अफगाणिस्तानने एकही चौकार-षटकार न मारता १५ धावा केल्या आहेत.
सामन्याला सुरूवात
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील वर्ल्डकप सामन्याला सुरूवात झाली आहे. अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाज व इब्राहिम झाद्रान ही जोडी उतरली आहे. तर न्यूझीलंडकडून मॅट हेन्री गोलंदाजी करत आहे.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान, सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमातुल्ला ओमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), फजलहक फारुकी, मुजीब उर रहमान, झियाउर रहमान शरीफी
न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन
फिन ऍलन, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर (कर्णधार), जेम्स नीशम, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी
AFG vs NZ live: नाणेफेक
अफगाणिस्तान संघाने पहिल्या टी-२० विश्वचषक सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यासह न्यूझीलंडचा संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल.
NZ vs AFG: दोन्ही संघांचा पहिला सामना
अफगाणिस्तान व न्यूझीलंड संघ आज टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरूवात करत आहे. दोन्ही संघांचा हा सामना चेन्नईतील चेपॉकमध्ये खेळवला जाईल.

NZ vs AFG Highlights, ICC T20 World Cup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये न्यूझीलंडने जायंट किलर अफगाणिस्तानचा पराभव केला आहे.

