न्यूझीलंडचा महान फलंदाज रॉस टेलर त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी बांगलादेशविरुद्ध ख्राइस्टचर्चच्या मैदानावर उतरला. यावेळी टेलर खूपच भावूक झाला. नाणेफेकीनंतर राष्ट्रगीत सुरू असताना टेलरचे डोळ्यात पाणी आले आणि तो शेवटपर्यंत आपले अश्रू रोखू शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेलरचा भावूक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बांगलादेशच्या संघाच्या दृष्टीकोनातून हा सामना त्यांच्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने जिंकला. बांगलादेशने कसोटीत या देशाविरुद्ध विजय मिळवण्याची आणि किवींसोबतच्या १७ सामन्यांच्या कसोटी इतिहासात ही पहिलीच वेळ होती. या सामन्यासह मोमनुल हकच्या नेतृत्वाखालील संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. असे झाले तर बांगलादेश इतिहास रचेल.

टेलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३० जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो न्यूझीलंडकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. टेलर न्यूझीलंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत संयुक्त पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या कारकिर्दीतील हा ११२ वा कसोटी सामना आहे. त्याच्या आधी माजी कर्णधार आणि फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीने न्यूझीलंडकडून ११२ कसोटी सामने खेळले आहेत.

हेही वाचा – भारत-आफ्रिका कसोटी मालिका : बचावात्मक इशांत की आक्रमक उमेश?

न्यूझीलंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम टेलरच्या नावावर आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nz vs ban ross taylor gets emotional during the national anthem watch video adn
First published on: 09-01-2022 at 13:14 IST