New Zealand vs South Africa Highlights: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २४ वा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार एडेन मारक्रमने दमदार अर्धशतकी खेळी केली. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं आव्हान षटकात पूर्ण केलं. या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ७ गडी बाद १७५ धावा केल्या. न्यूझीलंडकडून सलामीला आलेला टीम सेफर्ट अवघ्या १३ धावा करून माघारी परतला. तर फिन अॅलेनने ३१ धावा केल्या. तर रचिन रवींद्र अवघ्या १३ धावा करून माघारी परतला. ग्लेन फिलिप्सलाही या सामन्यात फ्लॉप ठरला. तो १ धाव करून माघारी परतला. तर मार्क चॅपमनने ४८ धावांची दमदार खेळी केली. तर डॅरिल मिशेलने ३२ धावांचे योगदान दिले. शेवटी जिमी निशमने नाबाद २३ धावांची खेळी करून न्यूझीलंडची धावसंख्या ७ गडी बाद १७५ धावांवर पोहोचवली.

दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १७६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अपेक्षित सुरूवात मिळाली. सलामीला आलेल्या एडेन मारक्रम आणि क्विंटन डी कॉक यांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत पहिल्या विकेटसाठी ६२ धावा जोडल्या. क्विंटन डी कॉक १४ चेंडूत २० धावा करून माघारी परतला. त्यानंतर मारक्रमने रायन रिकल्टनसोबत मिळून डाव सांभळला आणि ७ षटकात संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली. रायन रिकल्टन २१ धावा करून माघारी परतला. पण एडेन मारक्रमने एक बाजू धरून ठेवली होती.

डेवाल्ड ब्रेव्हिस १७ चेंडूत २१ धावांची खेळी करून माघारी परतला. तर कर्णधार एडेन मारक्रम शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने ४४ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. त्याला साथ देत डेव्हिड मिलरने २४ धावांची खेळी केली. यासह दक्षिण आफ्रिकेला हा सामना ७ गडी राखून जिंकून दिला.