New Zealand vs South Africa: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २४ वा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडने ७ गडी बाद १७५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना एडेन मारक्रमने दमदार अर्धशतकी खेळी केली आणि संघाला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.
New Zealand vs South Africa: न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे हायलाईट्स.
NZ vs SA Live Score: एडेन मारक्रमची तुफान फटकेबाजी! अवघ्या इतक्या चेंडूत झळकावलं अर्धशतक
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून डावाची सुरूवात करताना एडेन मारक्रमने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.
NZ vs SA Live: दक्षिण आफ्रिकेची दमदार सुरूवात! ३ षटकात संघाच्या ५० धावा पूर्ण
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने दमदार सुरूवात केली आहे. अवघ्या ३ षटकात संघाने ५० धावांचा पल्ला गाठला आहे.
NZ vs SA: न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडने ७ गडी बाद १७५ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १७६ धावा करायच्या आहेत.
NZ vs SA Live: न्यूझीलंडचा निम्मा संघ परतला तंबूत
न्यूझीलंडला पाचवा धक्का बसला आहे. मार्क चॅपमन बाद होऊन माघारी परतला आहे.
NZ vs SA Live: ग्लेन फिलिप्स परतला माघारी
केशव महाराजने न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला आहे. ग्लेन फिलिप्स एका धावेवर माघारी परतला आहे.
NZ vs SA Live: एडेन मारक्रमने घेतला भन्नाट कॅच! न्यूझीलंडला लागोपाठ दुसरा धक्का
आधी डेव्हिड मिलरने कॅच घेऊन रचीन रविंद्रला १३ धावांवर माघारी धाडलं. आता एडेन मारक्रमने कॅच घेऊन फिन अॅलेनला ३१ धावांवर माघारी धाडलं आहे.
NZ vs SA Live: न्यूझीलंडला पहिला मोठा धक्का! टीम सेफर्ट स्वस्तात परतला माघारी
न्यूझीलंडला चौथ्या षटकात मोठा धक्का बसला आहे. टीम सेफर्ट १३ धावा करून माघारी परतला आहे.

New Zealand vs South Africa : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे हायलाईट्स.

