घरच्या मैदानावर श्रीलंकेला अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडने ८४/६ या परिस्थितीतून १६८ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेला १०७ धावाच करता आल्या.
NZ vs SL Cricket Score, New Zealand vs Sri Lanka T20 World Cup Super 8 न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका टी२० वर्ल्डकप सुपर८ मुकाबला स्कोअर
श्रीलंकेने गाशा गुंडाळला, न्यूझीलंडचा दमदार विजय
यजमान श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवासह श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
रचीन रवींद्रचा भेदक मारा
रचीन रवींद्रने ४ षटकात २७ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स घेत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडलं.
श्रीलंकेची पडझड सुरूच
न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध आक्रमणासमोर श्रीलंकेने सपशेल शरणागती पत्करली आहे.
श्रीलंकेचा कर्णधार दासून शनका माघारी
रचीन रवींद्रच्या जादुई गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा कर्णधार दासून शनकानेही गुडघे टेकले.
रचीन रवींद्रने एका षटकात पटकावल्या दोन विकेट्स
रचीन रवींद्रने पहिल्याच षटकात कुशल मेंडिस आणि पवन रत्नायके यांना बाद करत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडलं.
NZ vs SL Live: श्रीलंकेला दुसरा मोठा धक्का! असलंका परतला माघारी
श्रीलंकेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे . असलंका ५ धावांवर माघारी परतला आहे.
NZ vs SL Live: पहिलाच बॉल, पहिला मोठा धक्का! निसांका गोल्डन डकवर परतला माघारी
श्रीलंकेला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला आहे. मॅट हेनरीच्या पहिल्याच चेंडूवर निसांका त्रिफळाचित झाला आहे.
NZ vs SL Live: फ्लॉप सुरूवात, पण शेवट दमदार! न्यूझीलंडने श्रीलंकेसमोर विजयासाठी ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
या सामन्यात न्यूझीलंडला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. पण शेवटी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. यासह २० षटकांअखेर ७ गडी बाद १६८ धावा केल्या. यासह श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी १६९ धावांची गरज आहे.
NZ vs SL Live: न्यूझीलंडच्या १०० धावा पूर्ण
न्यूझीलंडचे फलंदाज या सामन्यात संघर्ष करताना दिसून आले आहेत. दरम्यान १७ व्या षटकात न्यूझीलंडने १०० धावांचा पल्ला गाठला आहे.
NZ vs SL Live: W,W,W..., न्यूझीलंडला लागोपाठ ३ मोठे धक्के!
पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडला लागोपाठ ३ मोठे धक्के बसले आहेत. रचिन रवींद्रनंतर मार्क चॅपमन आणि डॅरिल मिशेल देखील स्वस्तात बाद होऊन माघारी परतला आहे.
NZ vs SL Live: आधी कॅच सुटला, पुढच्याच बॉलवर दांडी गुल! फिलिप्स परतला माघारी
चमीराने टाकलेल्या भन्नाट चेंडूव ग्लेन फिलिप्स बाद होऊन माघारी परतला आहे. फिलिप्सने १८ धावा केल्या.
NZ vs SL Live: न्यूझीलंडला दुसरा मोठा धक्का! सैफर्ट परतला माघारी
न्यूझीलंडला सुरूवातीलाच दुसरा मोठा धक्का बसला आहे. टीम सैफर्ट अवघ्या ८ धावा करून माघारी परतला आहे.
चमीराने सैफर्टला धाडलं तंबूत
दुश्मंत चमीराचा चेंडू फ्लिक करायचा टीम सैफर्टचा प्रयत्न कामिंदू मेंडिसच्या हातात जाऊन विसावला.
तीक्षणाने केली परतफेड
महेश तीक्षणाने स्वत:च्याच गोलंदाजीवर फिन अॅलनचा सुरेख झेल टिपला. मागच्या षटकात त्याने टीम सैफर्टचा झेल सोडला होता.
न्यूझीलंडने वसूल केले तीन चौकार
दुनिथ वेल्लागेच्या पहिल्या षटकात न्यूझीलंडने तीन चौकार वसूल केले.
न्यूझीलंडची आक्रमक सुरुवात
न्यूझीलंडने पहिल्या षटकात ८ धावांसह सकारात्मक सुरुवात केली आहे.
NZ vs SL Live: या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), कोल मॅककॉन्ची, मॅट हेन्री, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), चरित असलंका, पवन रथनायके, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्लालागे, दुशान हेमंथा, दुष्मंथा चमीरा, महेश तीक्षणा, दिलशान मदुशंका
NZ vs SL Live Score: श्रीलंकेचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय! पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ११
या महत्वाच्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

NZ vs SL Cricket Score, New Zealand vs Sri Lanka T20 World Cup Super 8 Match Scorecard Updates: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका टी२० वर्ल्डकप स्कोअर अपडेट्स

