2027 ODI World Cup Full Schedule: बहुप्रतीक्षित वनडे विश्वचषक २०२७ चं वेळापत्रक आयसीसीकडून जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं यजमानपद दक्षिण आफ्रिका, नामिबिया व झिम्बाब्वेकडे आहे. २४ वर्षांनंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. केप टाउन येथे झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. १४ संघांमध्ये आणि १२ ठिकाणी होणारी ही स्पर्धा रविवार २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर अंतिम सामना २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

केप टाउनमधील ‘झिट्झ म्युझियम ऑफ कंटेम्पररी आर्ट आफ्रिका’ येथे होत आहे. आयसीसीच्या या प्रमुख स्पर्धेला सुरुवात होण्यास आता साधारणपणे एका वर्षाचा कालावधी उरलेला असताना स्पर्धेचं संपूर्ण चित्र स्पष्ट करण्यात आलं आहे. भारताला २०२३ मध्ये पराभवाचा धक्का देणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या सामन्याने स्पर्धेला सुरूवात होणार आहे.

१४ संघांच्या या विश्वचषकासाठीचे गट आणि सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक आयसीसीच्या (ICC) या कार्यक्रमात जाहीर करण्यात आलं. या स्पर्धेतील सामने तीन देशांमधील एकूण १२ मैदानांवर खेळवले जातील. नव्या फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. वनडे वर्ल्डकप २०२७ मधील दोन गट असणार आहेत. या दोन्ही गटात एकूण सहा संघ असतील. त्यापैकी प्रत्येक गटातील ५-५ संघ जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान क्वालिफायर स्पर्धा झाल्यानंतर उर्वरित दोन संघ जाहीर होतील. भारत-पाकिस्तानशिवाय अ गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया व झिम्बाब्वे हे संघ आहेत. तर ब गटात बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड या संघांचा समावेश करण्यात आला आहे.

वनडे वर्ल्डकप २०२७मधील दोन्ही गटातील संघ

अ गट – अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, झिम्बाब्वे, क्वालिफायर-अ

ब गट – बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, क्वालिफायर – ब

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 चं संपूर्ण वेळापत्रक

  • शनिवार, २ ऑक्टोबर: QF1 विरुद्ध QF3 — विंडहोक
  • सोमवार, ४ ऑक्टोबर: QF1 विरुद्ध QF2 — विंडहोक
  • बुधवार, ६ ऑक्टोबर: QF2 विरुद्ध QF3 — विंडहोक
  • गुरुवार, ७ ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया — केपटाऊन
  • शुक्रवार, ८ ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान — त्शवाने
  • शुक्रवार, ८ ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध बांगलादेश — विंडहोक
  • शनिवार, ९ ऑक्टोबर: झिम्बाब्वे विरुद्ध क्वालिफायर A — बुलावायो
  • शनिवार, ९ ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड — केपटाऊन
  • रविवार, १० ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान — जोहान्सबर्ग
  • रविवार, १० ऑक्टोबर: श्रीलंका विरुद्ध क्वालिफायर B — विंडहोक
  • सोमवार, ११ ऑक्टोबर: झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान — बुलावायो
  • मंगळवार, १२ ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर A — पार्ल
  • मंगळवार, १२ ऑक्टोबर: न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश — कुगोम्पो सिटी
  • बुधवार, १३ ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका — विंडहोक
  • बुधवार, १३ ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर B — पार्ल
  • गुरुवार, १४ ऑक्टोबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान — त्शवाने
  • शुक्रवार, १५ ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर A — ब्लोमफोंटेन
  • शुक्रवार, १५ ऑक्टोबर: झिम्बाब्वे विरुद्ध ऑस्ट्रेलिया — हरारे
  • शनिवार, १६ ऑक्टोबर: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश — डरबन
  • शनिवार, १६ ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड — गेकेबरहा
  • रविवार, १७ ऑक्टोबर: भारत विरुद्ध क्वालिफायर A — ब्लोमफोंटेन
  • रविवार, १७ ऑक्टोबर: न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर B — हरारे
  • सोमवार, १८ ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान — कुगोम्पो सिटी
  • मंगळवार, १९ ऑक्टोबर: झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान — हरारे
  • मंगळवार, १९ ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश — डरबन
  • बुधवार, २० ऑक्टोबर: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका — जोहान्सबर्ग
  • बुधवार, २० ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर B — हरारे
  • गुरुवार, २१ ऑक्टोबर: अफगाणिस्तान विरुद्ध क्वालिफायर A — कुगोम्पो सिटी
  • शुक्रवार, २२ ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान — पार्ल
  • शुक्रवार, २२ ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका — जोहान्सबर्ग
  • शनिवार, २३ ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड — गेकेबरहा
  • शनिवार, २३ ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध क्वालिफायर B — त्शवाने
  • रविवार, २४ ऑक्टोबर: झिम्बाब्वे विरुद्ध भारत — व्हिक्टोरिया फॉल्स

सुपर स्टेजचे सामने

  • सोमवार, २५ ऑक्टोबर: A2 विरुद्ध B3 — जोहान्सबर्ग
  • मंगळवार, २६ ऑक्टोबर: B1 विरुद्ध A3 — गेकेबरहा
  • बुधवार, २७ ऑक्टोबर: B2 विरुद्ध AB4 — त्शवाने
  • गुरुवार, २८ ऑक्टोबर: A1 विरुद्ध A2 — व्हिक्टोरिया फॉल्स
  • शुक्रवार, २९ ऑक्टोबर: B1 विरुद्ध B3 — कुगोम्पो सिटी
  • शनिवार, ३० ऑक्टोबर: A3 विरुद्ध AB4 — व्हिक्टोरिया फॉल्स
  • रविवार, ३१ ऑक्टोबर: B2 विरुद्ध A1 — जोहान्सबर्ग
  • सोमवार, १ नोव्हेंबर: A2 विरुद्ध B1 — व्हिक्टोरिया फॉल्स
  • मंगळवार, २ नोव्हेंबर: B3 विरुद्ध AB4 — केपटाऊन
  • बुधवार, ३ नोव्हेंबर: B2 विरुद्ध A3 — डरबन
  • गुरुवार, ४ नोव्हेंबर: A1 विरुद्ध B1 — पार्ल
  • शुक्रवार, ५ नोव्हेंबर: A2 विरुद्ध AB4 — डरबन
  • शनिवार, ६ नोव्हेंबर: B2 विरुद्ध B3 — ब्लोमफोंटेन
  • रविवार, ७ नोव्हेंबर: A1 विरुद्ध A3 — केपटाऊन
  • सोमवार, ८ नोव्हेंबर: B1 विरुद्ध AB4 — डरबन
  • मंगळवार, ९ नोव्हेंबर: B2 विरुद्ध A2 — गेकेबरहा
  • बुधवार, १० नोव्हेंबर: A3 विरुद्ध B3 — ब्लोमफोंटेन
  • गुरुवार, ११ नोव्हेंबर: A1 विरुद्ध AB4 — गेकेबरहा
  • शुक्रवार, १२ नोव्हेंबर: B2 विरुद्ध B1 — केपटाऊन
  • शनिवार, १३ नोव्हेंबर: A2 विरुद्ध A3 — ब्लोमफोंटेन
  • रविवार, १४ नोव्हेंबर: A1 विरुद्ध B3 — डरबन

नॉकआउट सामने

  • बुधवार, १७ नोव्हेंबर: पहिला उपांत्य सामना — केपटाऊन
  • गुरुवार, १८ नोव्हेंबर: दुसरा उपांत्य सामना — त्शवाने
  • रविवार, २१ नोव्हेंबर: अंतिम सामना — जोहान्सबर्ग