प्रत्येक सामना जिंकू शकत नाही, पराभवाचा इतका विचार करु नका – चहल

वन-डे मालिकेत भारताचा दारुण पराभव

यजुवेंद्र चहल भारतीय संघासाठी क्रिकेट तर खेळतोच त्या व्यतिरित्क तो आयकर विभागात इन्स्पेक्टर या पदावर काम करतोय.

सलामीवीर मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने अखेरच्या वन-डे सामन्यातही बाजी मारली आहे. भारताने विजयासाठी दिेलेलं २९७ धावांचं आव्हान न्यूझीलंडने ५ गडी राखत पूर्ण केलं. या विजयासह न्यूझीलंडने वन-डे मालिकेत भारताला व्हाईटवॉश दिला असून, टी-२० मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.

अवश्य वाचा – BLOG : या पराभवाची संघाला गरज होती !

मात्र या पराभवाचा भारतीय संघावर फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये. फिरकीपटू युजवेंद्र चहलने या पराभवाचा इतका विचार करु नका असं वक्तव्य केलं आहे. “गेल्या ४-५ वर्षांचा इतिहास पाहिला तर हा आमचा चौथा किंवा पाचवा मालिका पराभव होता. प्रतिस्पर्धी संघही खेळण्यासाठीच मैदानात उतरतो, त्यामुळे तुम्ही प्रत्येक सामना जिंकू शकत नाही. आम्ही एक मालिका जिंकलो आणि एक हरलो, त्यामुळे या पराभवाचा इतका गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही”, सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चहल बोलत होता.

पृथ्वी आणि मयांकला पहिल्यांदाच वन-डे संघात संधी मिळाली होती. नवोदीत खेळाडूंना न्यूझीलंडसारख्या देशात खेळणं हे सोपं नसतं. पण हा फक्त वन-डे मालिकेतला पराभव आहे, आम्ही टी-२० मालिकेत निर्भेळ यश संपादन केलं आहे. आमच्यासाठी ही सकारात्मक गोष्ट आहे, चहल संघाच्या कामगिरीविषयी बोलत होता. वन-डे मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड २१ तारखेपासून कसोटी मालिका खेळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Odi series defeat is not something very serious to ponder about says chahal psd

ताज्या बातम्या