या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक २०२३ भारतात आयोजित केला जाणार आहे. मेन इन ब्लू ला १० वर्षांचा दुष्काळ संपवायचा आहे. त्यासाठीची तयारीही सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २० खेळाडूंना शॉर्टलिस्ट केले असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, माजी सलामीवीर आणि माजी निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी विराट कोहलीने गौतम गंभीरप्रमाणे फिनिशरची भूमिका बजावली पाहिजे, असे म्हटले आहे. याशिवाय इतर खेळाडूंची भूमिका काय असावी हेही सांगितले.

स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाले, “आम्हाला त्याची भूमिका स्पष्ट करण्याची गरज का आहे? इशान किशनकडे बघा, तो ज्या पद्धतीने चेंडू मारतो, त्याने नुकतेच द्विशतकही केले आहे. फक्त या खेळाडूंना तिकडे जाऊन त्यांचा खेळ खेळायला सांगा. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. इशान किशनप्रमाणेच तुम्हाला आणखी दोन-तीन खेळाडू हवे आहेत, जे निर्भय क्रिकेट खेळायला घाबरत नाहीत. या फळीमध्ये अष्टपैलू, फलंदाजी अष्टपैलू, गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आवश्यक असतील. संघात या खेळाडूंचे संयोजन असावे.”

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Manoj Tiwary's statement on Shivam Dube
Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Virat Kohli breaks Gayle's record
KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज

हेही वाचा – India’s captaincy: कपिल देव यांनी रोहित शर्माच्या फिटनेसवर उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, ‘तो कर्णधारपदासाठी …’

कृष्णमाचारी श्रीकांत विराट कोहलीला काय म्हणाले?

कृष्णमाचारी श्रीकांत पुढे म्हणाले, “जशी गौतम गंभीरने मागे अँकरची भूमिका बजावली होती, तशीच भूमिका विराट कोहलीनेही यावेळी निभावली पाहिजे. त्यामुळे इशान किशनसारख्या खेळाडूला मदत होईल. किशनने द्विशतक झळकावले तेव्हा त्याने शतक केले. खेळाडूंना स्वातंत्र्य देण्यावर सर्व काही अवलंबून आहे. तुम्हाला जे करायचंय ते करा. तुम्ही बाद झाला तरीही तुमचा खेळ खेळा, हाच संघाचा दृष्टिकोन असायला हवा.”

शुभमन गिल आणि शार्दुल ठाकूर नसतील –

बीसीसीआयने दिलेल्या यादीतून तुम्ही कोणाचा समावेश करणार आणि कोणाला वगळणार यावर श्रीकांत यांनी आपले मत मांडले. या विश्वचषकात भारतासाठी कोणते खेळाडू सामने जिंकू शकतात? तो म्हणाला, “माझ्या यादीत दोन खेळाडू नसतील, शुबमन गिल आणि शार्दुल ठाकूर. जसप्रीत बुमराह, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज हे माझे वेगवान गोलंदाज असतील. चार मध्यमगती गोलंदाज पुरेसे आहेत. मोहम्मद शमीचा समावेश होऊ शकतो.”

हेही वाचा – MCA Awards Function: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वीच श्रेयस अय्यरला एक नव्हे तर मिळाले पाच पुरस्कार

कृष्णमाचारी श्रीकांत यांचे ऋषभ पंतबाबत वक्तव्य –

श्रीकांत पुढे म्हणाले, “मी निवडकर्त्यांचा अध्यक्ष म्हणून बोलत आहे, चाहता म्हणून नाही. मी दीपक हुड्डाला घेईन. मला विश्वास आहे की हेच लोक सामने जिंकतील. तुम्हाला काय हवे आहे? जर तुम्हाला सामने जिंकायचे असतील तर तुम्हाला युसूफ पठाणसारखे खेळाडू हवे आहेत, जे तुम्हाला एकहाती सामने जिंकून देतील. दहापैकी तीन सामने त्यांनी जिंकले तरी ते पुरेसे आहे. या खेळाडूंकडून सातत्याची अपेक्षा करू नका. सध्या आमच्या संघात ऋषभ पंत असा खेळाडू आहे. त्यांच्याकडून सातत्याची अपेक्षा करू नका. मला सातत्य नको आहे. मला सामना जिंकायचा आहे. हे लोक स्वतःहून हे करू शकत असतील तर उत्तम. तुमच्यासाठी हे कोण करेल? ऋषभ पंत तुमच्यासाठी ते करेल.”