श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता, पण अफगाणिस्तानसाठी सामना रद्द झाल्याने खूप फायदा झाला. कारण ते पुढील वर्षी भारतात होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले. अफगाणिस्तान संघासाठी ही आनंदाची बातमी ठरली, तर दुसरीकडे श्रीलंकेला २०२३च्या विश्वचषकात थेट पात्र ठरणे कठीण झाले आहे. कदाचित त्यांना पात्रता फेरीतील सामने खेळून मग मुख्य स्पर्धेत सहभाग घेता येईल. माजी विश्वचषक विजेते श्रीलंकेसाठी ही फार मोठी नामुष्की ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग (२०२०-२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग) च्या गुणतालिकेत, अफगाणिस्तान संघ ७व्या क्रमांकावर आहे आणि त्याचे ११५ गुण आहेत. श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना रद्द झाल्यामुळे अफगाणिस्तान संघाला ५ गुण मिळाले, ज्यामुळे संघ गुणतालिकेत ७व्या क्रमांकावर पोहोचला आणि थेट विश्वचषकासाठी पात्र ठरला.

दुसरीकडे, श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत १०व्या क्रमांकावर असून त्यांचे केवळ ६७ गुण आहेत. तसे, जर श्रीलंकेला थेट विश्वचषकासाठी पात्र ठरायचे असेल तर त्यांना त्यांचे उर्वरित सर्व ४ सामने जिंकावे लागतील. मात्र त्यानंतरही इतर संघांचे समीकरण बघितले जाईल, त्यानंतरच निर्णय होईल. , पण यावेळी श्रीलंकेला थेट विश्वचषकासाठी पात्र ठरणे कठीण दिसत आहे.

हेही वाचा : ब्रेट लीने अर्शदीप सिंगला दिला हा खास सल्ला, जाणून घ्या काय म्हणाला ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज

हे आहेत पात्र ठरलेले सात संघ

२०२३च्या विश्वचषकासाठी आतापर्यंत ७ संघ थेट पात्र ठरले आहेत. त्यात यजमान भारताने थेट पात्रता फेरीत स्थान मिळवले आहे, तर दुसरीकडे, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान आणि आता अफगाणिस्तान हे संघ पात्र ठरले आहेत.

श्रीलंका आणि आफ्रिका संघ यांच्यात सामना

आतापर्यंत थेट पात्र न ठरलेले संघ वेस्ट इंडिज, आयर्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स हे आहेत. या संघांमध्ये अपेक्षा आहे की दक्षिण आफ्रिकेचा संघ थेट पात्र ठरण्याचा प्रयत्न करेल. वर्ल्ड कप सुपर लीग दरम्यान प्रत्येकाला २४-२४ सामने खेळायचे आहेत, आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कप सुपर लीग दरम्यान १६ सामने खेळले आहेत आणि त्यांचे ५९ गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेला अजून ५ सामने खेळायचे आहेत. येथून ५ सामने जिंकण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आले तर संघाला थेट पात्रता मिळवण्याची संधी मिळू शकते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odi world cup 2023 seven teams qualify directly including afghanistan shock big teams avw
First published on: 28-11-2022 at 12:29 IST