Ollie Robinson Jasprit Bumrah Test Record: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन हा पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी मालिका विजयाचा हिरो ठरला. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये ऑली रॉबिन्सनने प्रत्येकी ८-८ विकेट्स घेतल्या. रॉबिन्सनच्या भेदक गोलंदाजी माऱ्यापुढे पाकिस्तानचे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. लॉर्ड्स कसोटीत रॉबिन्सनने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीदरम्यान त्याने जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडला आहे.

लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानविरुद्धच्या विजयात ऑली रॉबिन्सन केवळ आठ बळी घेत विजयाचा हिरो ठरला नाही, तर त्याने आपली कसोटी गोलंदाजीची सरासरी इतकी सुधारली की तो जसप्रीत बुमराहच्याही पुढे गेला. गेल्या ११२ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये किमान २० सामने खेळलेल्या गोलंदाजांपैकी सध्या ऑली रॉबिन्सनपेक्षा चांगली सरासरी कोणाचीही नाही.

ऑली रॉबिन्सनने घडवला इतिहास

लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानविरुद्ध यशस्वी विजय मिळवल्यानंतर, ऑली रॉबिन्सनच्या नावावर आता २३ कसोटी सामन्यांत १९.५३ च्या सरासरीने ९९ विकेट्स आहेत, जी १९१४ नंतरची सर्वोत्तम कामगिरी आहे. या बाबतीत ऑली रॉबिन्सनने जसप्रीत बुमराहला मागे टाकलं आहे. बुमराहची सरासरी १९.७९ इतकी असून त्याने ५२ कसोटी सामन्यांत २३४ विकेट्स घेतल्या आहेत. याचा अर्थ असा की, गेल्या ११२ वर्षांत सर्वोत्तम सरासरी असलेला कसोटी गोलंदाज म्हणून बुमराहकडे असलेला मान आता रॉबिन्सनकडे आला आहे.

दुसऱ्या डावात विकेट्स घेतल्यानंतर ऑली रॉबिन्सनची कसोटीतील गोलंदाजीची सरासरी सुमारे १९.५ पर्यंत पोहोचली. त्यामुळे २००० नंतर कसोटी पदार्पण केलेल्या आणि किमान २० कसोटी सामने खेळलेल्या गोलंदाजांमध्ये रॉबिन्सनने जसप्रीत बुमराहची १९.७९ची सरासरी मागे टाकली. रॉबिन्सनने २३ कसोटी सामने खेळले असून ४३ डावांत गोलंदाजी करत ९९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी १९.५३ असून डावातील सर्वोत्तम कामगिरी ५/३९ अशी आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराहने ५२ कसोटी सामन्यांत २३४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची गोलंदाजीची सरासरी १९.७९ असून डावातील सर्वोत्तम कामगिरी ६/२७ अशी आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वोत्तम गोलंदाजी सरासरीचा विक्रम इंग्लंडच्या विल्यम बर्न्स यांच्या नावावर आहे. त्यांनी २१ कसोटी सामन्यांत १५.५४ च्या सरासरीने ५१ विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजीची सरासरी (किमान २० कसोटी सामने)

  • विल्यम बार्न्स (इंग्लंड, १८९०): २१ कसोटी, ५१ विकेट्स, सरासरी १५.५४, सर्वोत्तम ६/२८
  • सिडनी बार्न्स (इंग्लंड, १९१४): २७ कसोटी, १८९ विकेट्स, सरासरी १६.४३, सर्वोत्तम ९/१०३
  • रॉबर्ट पिल (इंग्लंड, १८९६): २० कसोटी, १०१ विकेट्स, सरासरी १६.९८, सर्वोत्तम ७/३१
  • जॉनी ब्रिग्स (इंग्लंड, १८९९): ३३ कसोटी, ११८ विकेट्स, सरासरी १७.७५, सर्वोत्तम ८/११
  • ऑली रॉबिन्सन (इंग्लंड, २०२६):* २३ कसोटी, ९९ विकेट्स, सरासरी १९.५३, सर्वोत्तम ५/३९
  • जसप्रीत बुमराह (भारत, २०२६):* ५२ कसोटी, २३४ विकेट्स, सरासरी १९.७९, सर्वोत्तम ६/२७