प्रत्येक कसोटी सामना आणि मालिकेगणिक इंग्लंडचा ओली रॉबिन्सन नवनवे अनोखे विक्रम प्रस्थापित करत आहे. २०२१ मध्ये पदार्पणानंतर काही वर्षांपूर्वी केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटमुळे बंदीची कारवाई झालेला रॉबिन्सन आता इंग्लंडचं प्रमुख अस्त्र झाला आहे.
शनिवारी आटोपलेल्या बर्मिंगहॅम कसोटीनंतर रॉबिन्सनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. तीन सामन्यांच्या मालिकेत रॉबिन्सनने ८.७६च्या सरासरीने २१ विकेट्स पटकावत पाकिस्तानच्या डावाला सातत्याने खिंडार पाडलं.
या मालिकेतल्या पहिल्या कसोटीत रॉबिन्सनने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर अझान अवैसला बाद करत इंग्लंडला स्वप्नवत सुरुवात करून दिली. जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कार्यकाळात पूर्णवेळ कर्णधार म्हणून रूटचा हा पहिलाच सामना आहे. त्यानंतर नवीन चेंडूची जबाबदारी रॉबिन्सनकडे आली आणि त्याने पहिल्याच चेंडूवर जादू दाखवली. पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याच्या या कामगिरीमुळे त्याने भारताचे महान अष्टपैलू कपिल देव यांच्या ४३ वर्षे जुन्या दुर्मिळ विक्रमाची बरोबरी केली.
ऑली रॉबिन्सन हा कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानी फलंदाजाला बाद करणारा जगातील केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी हा पराक्रम भारताचे महान अष्टपैलू कपिल देव यांनी केला होता. १९८३ मध्ये जालंधरच्या गांधी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात कपिल देव यांनी मोहसिन खानला पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं. आता ४३ वर्षांनंतर रॉबिन्सननेही अशीच कामगिरी करत कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली. तर गेल्या ४३ वर्षांत ही अनोखी कामगिरी करणारा रॉबिन्सन हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
दरम्यान, कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची ही इंग्लंडच्या गोलंदाजाची सहावी घटना आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडच्या भूमीवर खेळताना अशी कामगिरी करणारा रॉबिन्सन हा चौथा इंग्लिश गोलंदाज ठरला आहे. आणखी एक रंजक योगायोग म्हणजे, इंग्लंडविरुद्ध खेळताना आजवर कोणत्याही विदेशी गोलंदाजाने कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतलेली नाही. विशेष म्हणजे, या विक्रमाची पहिली नोंद बरोबर १०० वर्षांपूर्वी हेडिंग्लेमध्येच झाली होती.
या मालिकेतील अद्भुत कामगिरीसह रॉबिन्सनची सरासरी १९पेक्षाही कमी आहे. ११२ वर्षानंतर पहिल्यांदाच किमान २० कसोटी खेळलेल्या गोलंदाजाची सरासरी १९पेक्षा कमी आहे. ३२वर्षीय रॉबिन्सनने २४ सामन्यात १९.२५च्या सरासरीने १०४ विकेट्स पटकावल्या आहेत. रॉबिन्सनने ५ वेळा डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत. ६ फुटांपेक्षा जास्त उंचीचं वरदान लाभलेला रॉबिन्सन सातत्याने ऑफस्टंपवर मारा करत फलंदाजांना अडचणीत टाकतो. ग्लेन मॅकग्रा आणि जोश हेझलवूड यांच्याशी त्याची तुलना केली जाते.
कारकिर्दीत दुखापतींनी रॉबिन्सनला सतत सतवलं आहे. गोलंदाजीच्या बरोबरीने रॉबिन्सनने उपयुक्त फलंदाजीही करतो. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २ अर्धशतकंही आहेत. फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये १२२ सामन्यात रॉबिन्सनच्या नावावर तब्बल ५२० विकेट्स आहेत.
संस्मरणीय पदार्पण आणि वादाचं गालबोट
कारकिर्दीच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ७ बळी घेणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याला कारकीर्दीच्या दुसर्या सामन्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आलं होतं.
२०१२-२०१३मध्ये ओली रॉबिन्सनने आपल्या जुन्या ट्वीटमध्ये काही शब्दांचा वापर करून विशिष्ट धर्मातील लोकांचा दहशतवादाशी संबंध असल्याचे म्हटले होते. शिवाय, त्याने महिला आणि आशियाई वंशाच्या लोकांवरही अपमानास्पद भाष्य केले गेले होते. त्याचे हे जुने ट्वीट लॉर्ड्स कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच दिवशी व्हायरल झाले होते. या प्रकरणाबद्दल रॉबिन्सनने लगेचच माफी मागितली होती.
कारकिर्दीच्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ७ बळी घेणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याला कारकीर्दीच्या दुसर्या सामन्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित करण्यात आलं होतं. ७-८ वर्षापूर्वी केलेल्या ट्वीटमुळे रॉबिन्सनवर ही कारवाई करण्यात आली होती.
