नीरज चोप्रासह १२ जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान!

मिताली राज, सुनिल छेत्री, रवीकुमार दहिया यांचा देखील आहे समावेश

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज टोक्यो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. नीरज चोप्रासह १२ खेळाडूंचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सर्वांना राजभवानात पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यामध्ये क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनिल छेत्री, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवीकुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेईन, हॉकीपटू पीआर श्रीजेश व मनप्रीतसिंह यांनाही खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, कृष्णा नागर, नेमबाज एम नरवाल, पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमीत अंतिल यांना देखील पुरस्कार देण्यात आला.

याशिवाय, क्रिकेटपटू शिखर धवन, पॅराबॅडमिंटनपटू सुहास यथिराज, पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल, उंच उडीतील खेळाडू निषाद कुमार आणि ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या भारतीय पुरूष हॉकी संघातील सर्वच खेळाडूंसह ३५ जणांना अर्जु पुरस्कारांना गौरविण्यात आलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Olympian neeraj chopra receives major dhyan chand khel ratna award from president ram nath kovind at rashtrapati bhavan in new delhi msr

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या