जागतिक विजेत्या लवलिना बोरगोहेनने ७५ किलो प्रकारात अंतिम फेरी गाठताना सलग दुसऱ्या वर्षी बॉिक्सगमध्ये ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. त्याच वेळी युवा खेळाडू प्रीतीला (५४ किलो) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. नरेंदरलाही ९२ किलोपेक्षा अधिक वजनी गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या लवलिनाने आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या थायलंडच्या बेसन मनिकोनविरुद्धची लढत अधिक सहज जिंकताना अंतिम फेरी गाठली.

प्रीतीने आपल्या लढतीत प्रयत्नांची पराकाष्ठा केली; पण गतविजेत्या चीनच्या चँग युआनचे आव्हान मोडून काढण्यात प्रीती उपयशी ठरली. उपांत्य लढतीत प्रीतीला ०-५ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. दोघींनी कमालीचा आक्रमक खेळ केला. फरक इतकाच होता की, चँगचे ठोसे प्रीतीच्या शरीरावर नेमके बसले, तर प्रीतीच्या ठोशांना हुलकावणी देण्यात चँग यशस्वी ठरली. लढतीत एक वेळ अशी आली होती की, १९ वर्षीय प्रीतीचे डबल जॅब, उजव्या हाताचे हूकचे दोन आणि शरीराचा वेध घेणारे दोन फटके अचूक बसले; पण त्यानंतर चँगने दाखवलेली आक्रमकता तिचे गतविजेतेपद सिद्ध करणारी ठरली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा >>>World Cup 2023: १२ वर्षांनंतर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा उचलणार वर्ल्डकप ट्रॉफी, ICCच्या ग्लोबल अ‍ॅम्बेसेडरपदी झाली नियुक्ती

ऑलिम्पिक पदकविजेती लवलिनाला विजयासाठी फारसे कष्ट पडले नाहीत. अचूक नियोजनबद्ध खेळ करत लवलिनाने प्रतिस्पर्धीस फारशी संधीच दिली नाही. दरम्यान पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत भारताच्या सचिन सिवचला चीनच्या ल्यु पिंगकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. पाठोपाठ ९२ किलोपेक्षा अधिक वजनी गटात नरेंदरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य लढतीत नरेंदरला कझाकस्तानच्या कुन्काबाएव कामशीबेककडून एकतर्फी लढतीत पराभव पत्करावा लागला.

Story img Loader