Paris Olympics 2024 Full List of Qualified Indian Athletes: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला येत्या २६ जुलैपासून सुरूवात होत आहे. यावेळी एकूण ११२ भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. भारतातून ६६ पुरुष खेळाडू आणि ४७ महिला खेळाडू या मोठ्या स्पर्धेसाठी पॅरिसला जाणार आहेत. २०२२ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नावावर ७ पदके होती. ज्यात एक सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश होता. यंदाच्या या ऑलिम्पिकमध्ये भारताकडून कोणकोणत्या खेळासाठी कोणते खेळाडू पात्र ठरले आहेत, याची एक सविस्तर यादी पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीरज कुमारने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. यंदाच्या ऑलिम्पिकमध्येही नीरजकडून देशाला सुवर्णकामगिरीची अपेक्षा आहे. नीरजशिवाय बॅडमिंटन आणि हॉकी संघाकडूनही भारताला पदकांची आशा आहे. यावेळी भारतीय हॉकी संघ सुवर्णपदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. कुस्तीत विनेश फोगटकडून पदकाच्या आशा आहेत. यावेळी सात्विक-चिरागच्या जोडीवर विशेष लक्ष असेल. याशिवाय लव्हेलिना-निखत यांच्याकडून बॉक्सिंगमध्येही भारतीय चाहत्यांना पदकाची आशा असेल.

हेही वााचा – कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठी पात्र झालेले भारतीय खेळाडू (Paris Olympics 2024 Indian Players List)

नेमबाजी

पृथ्वीराज तोंडाईमन – ट्रॅप
राजेश्वरी कुमार – ट्रॅप
संदीप सिंग – १० मी एअर रायफल आणि १० मी. एअर रायफल मिक्स्ड
अर्जुन बबुता – १० मी एअर रायफल
स्वप्निल कुसळे – ५० मीटर एअर रायफल ३ पोजीशन
ऐश्वर्य प्रताप सिंग – ५० मीटर एअर रायफल ३ पोजीशन
सिफत कौर समरा – ५० मीटर एअर रायफल ३ पोजीशन
अंजुम मौदगिल – ५० मीटर एअर रायफल ३ पोजीशन
एलावेनिव वेल्वारियन – १० मीटर एअर रायफल मिक्स्ड टीम
रमिता जिंदाल – १० मीटर एअऱर रायफल
संदीप सिंग – इलावेनिल वालारिवन – १० मीटर एअर रायफल मिश्र संघ
अर्जुन बाबुता- रमिता जिंदाल- १० मीटर एअर रायफल मिश्र संघ
अर्जुन चिमी – पुरुष १० मीटर एअर पिस्तूल
सरबज्योत सिंग – पुरुष १० मीटर एअर पिस्तूल
मनू भाकर- महिला १० मीटर एअर पिस्तूल
रिदम संगवम- महिला १० मीटर एअर पिस्तूल
विजयवीर सिद्धू – पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल
अनिश भानवाला – पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल
मनू भाकर- महिला २५ मीटर पिस्तूल
ईशा सिंग – महिला २५ मीटर पिस्तूल
सरबज्योत सिंग- मनू भाकर- १० मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ
अर्जुन चीमा-रिदम संगम- १० मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ

हेही वाचा – Champions Trophy: भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही, BCCI ने ICC समोर मांडला नवा प्रस्ताव

अ‍ॅथलेटिक्स
अक्षदीप सिंग – २० किमी रेस वॉक
प्रियांका गोस्वामी – २० किमी रेस वॉक
विकास सिंग – २० किमी रेस वॉक
परमजीत सिंग बिश्त – २० किमी रेस वॉक
अविनाश साबळे – ३०० मीटर स्टीपलचेस
पारुल चौधरी: ३०० मीटर स्टीपलचेस, महिला ५०० मीटर स्टीपलचेस
ज्योती याराजी- १०० मीटर स्टीपलचेस
किरण पहल- महिला ४०० मी
तजिंदरपाल सिंग तूर: पुरुष शॉट पुट
आभा खटुआ : महिला शॉट पुट
सर्वेश कुशारे : पुरुष उंच उडी
प्रवीण चित्रवेल – पुरुष लांब उडी
अब्दुल्ला अबूबकर: पुरुषांची तिहेरी उडी
मुहम्मद अनस याहिया, मोहम्मद अजमल, अमोज जैकब, संतोष तमिलारासन, राजेश रमेश – पुरुष ४४०० मीटर रिले, ४४०० मीटर रिले
विद्या रामराज, ज्योतिका श्री दांडी, एमआर पूवम्मा, सुभा व्यंकटेशन- महिला – ४*४०० मीटर रिले
प्रियांका गोस्वामी, सूरज पनवार – रेस वॉक मिश्र मॅरेथॉन

हेही वाचा – मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

बॅडमिंटन
एचएस प्रणॉय- पुरुष एकेरी
लक्ष्य सेन- पुरुष एकेरी
पीव्ही सिंधू – महिला एकेरी
सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराज शेट्टी – पुरुष दुहेरी
अश्विनी पोनप्पा आणि तनिषा कृष्टो – महिला दुहेरी

टेनिस
समित नागल- पुरुष एकेरी
रोहन बोपण्णा आणि श्रीराम बालाजी – पुरुष दुहेरी

हेही वाचा – रोहित-विराटने फायनलमध्ये बॅटिंग करण्यापूर्वीच दिले होते निवृत्तीचे संकेत, भावुक करणारा VIDEO व्हायरल

वेटलिफ्टिंग
मीराबाई चानू- महिला ४९ किलो

कुस्ती
अमन सेहरावत – पुरुष फ्री स्टाईल ५७ किलो
विनेश फोगट- महिला ५० किलो
अंशू मलिक – महिला ५७ किलो
निशा दहिया – महिला ६७ किलो
रितिका हुडा- महिला ७६ किलो
अंतिम पंघाल- महिला ५३ किलो

घोडेस्वारी
अनुष अग्रवाल- ड्रेसेज

हेही वाचा – मेस्सीच्या कुशीत असलेलं हे लहान बाळ घडवतंय इतिहास, स्पेनचा १६ वर्षीय लामिने यामल आणि दिग्गज मेस्सीचा फोटो व्हायरल

बॉक्सिंग
निखत जरीन- महिला ५० किलो
अमित बुरशी – पुरूष ५१ किलो
निशांत देव – पुरुष ७१ किलो
प्रीती पवार – महिला ५४ किलो
लव्हलिना बोरगोहेन – महिला ७५ किलो
जास्मिन लांबोरिया – महिला ५७ किलो

गोल्फ
शुभंकर शर्मा – पुरुष गोल्फ
गगनजीत भुल्लर – पुरुष गोल्फ
अदिती अशोक- महिला गोल्फर
दिक्षा डागर- महिला गोल्फर

हॉकी
महिला आणि पुरुष संघ

ज्युडो
तुलिका मान- महिला ७८ किलो

हेही वाचा –

रोइंग
बलराज पनवार : M1X

हेही वाचा – Video : पंतप्रधान मोदींना नीरज चोप्राच्या आईच्या हातचा ‘हा’ पदार्थ चाखण्याची इच्छा, म्हणाले…

नौकानयन
विष्णु सावरणन
नेत्रा कुमानन

पोहणे
धिनिधी देसिंघू- महिला २०० मीटर फ्रीस्टाइल
श्रीहरी नटराज – पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक

टेबल टेनिस
शरथ कमल- पुरुष एकेरी आणि पुरुष संघ
हरमिर देसाई- पुरुष एकेरी आणि पुरुष संघ
मानव ठक्कर- पुरुष संघ
मनिका बत्रा- महिला एकेरी आणि महिला संघ
श्रीजा अकुला- महिला एकेरी आणि महिला संघ
अर्चना कामथ- महिला संघ

भालाफेक
नीरज चोप्रा- पुरुष भालाफेक
किशोर जेना: भालाफेक
अन्नु राणी : महिला भालाफेक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Olympics 2024 full list of qualified indian players neeraj chopra pv sindhu nikhat zareen vinesh phogat hockey team bdg
Show comments