Olympics 2024 Results: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज म्हणजेच २५ जुलैपासून भारताच्या खेळांना सुरूवात झाली आहे. आज महिला तिरंदाजी स्पर्धेची रँकिंग फेरी पार पडली. भारताकडून तीन तिरंदाजांनी यात सहभाग घेतला पण कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. भारतीय तिरंदाजांमध्ये माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दीपिका कुमारीकडून सर्वाधिक अपेक्षा होत्या पण ती मागे पडली. मात्र, ही सांघिक स्पर्धा होती आणि असं असताना भारताच्या या तिन्ही महिला तिरंदाजांनी एकूण कामगिरी चांगली करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. हेही वाचा - Paris Olympic 2024 च्या पदकांचं आयफेल टॉवरशी खास कनेक्शन, ‘अशी’ तयार केली यंदाची पदकं दीपिका कुमारी व्यतिरिक्त भारताकडून अंकिता भगत आणि भजन कौर सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत एकूण ६४ तिरंदाजांचा सहभाग होता. अव्वल चार संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार होता आणि टीम इंडियाने चौथ्या स्थानी येत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. Paris Olympics 2024: महिला तिरंदाजी संघाची उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक रँकिंग फेरीत दीपिका, भजन आणि अंकिता या भारतीय त्रिकुटाने चमकदार कामगिरी करत एकूण १९८३ गुण मिळवले आणि पहिल्या चारमध्ये स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट बुक केले. भारताशिवाय दक्षिण कोरिया, चीन आणि मेक्सिकोचे संघही पहिल्या चारमध्ये आहेत. कोरियाच्या महिला संघाने २०४६ गुण, चीनने १९९६ गुण आणि मेक्सिकोच्या संघाने १९८६ गुण मिळवले आणि हे तिन्ही संघ भारतापेक्षा पुढे होते. हेही वाचा - Paris 2024 Olympics Schedule: भारताचं संपूर्ण वेळापत्रक, तारीख वेळेसहित कधी होणार हॉकी आणि बॅडमिंटनसहित सर्व खेळांचे सामने? भारतीय तिरंदाजांच्या वैयक्तिक गुणांमध्ये अंकिता भक्त सर्वात अचूक होती. तिने अचूक तिरंदाजी करत एकूण ६६६ गुण मिळवले आणि ती ११व्या क्रमांकावर राहिली. त्यांच्या खालोखाल भजन कौर हिने ६५९ गुणांसह २२ वे स्थान पटकावले. दीपिका कुमारी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकली नाही आणि ती ६५८ गुणांसह २३व्या स्थानावर राहिली. हेही वाचा - Paris Olympics 2024 सुरु होताच वादाच्या भोवऱ्यात, अर्जेंटिनाच्या खेळाडूंवर चाहत्यांनी फेकल्या बॉटल, मेस्सीची प्रतिक्रिया व्हायरल Olympics 2024: महिला तिरंदाजीतील उपांत्यपूर्व फेरीतील सामने दक्षिण कोरिया वि. यूएसए/चिनी तैपेई चीन वि. इंडोनेशिया/मलेशिया मेक्सिको वि. जर्मनी/ग्रेट ब्रिटन भारत वि. फ्रान्स/नेदरलँड