भारतीय महिला हॉकी संघाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जरी मिळाले नसले तरी, आपल्या खेळाने त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. ग्रेट ब्रिटनविरुद्ध, भारतीय संघाने ०-२ ने ३-२ अशी आघाडी घेत जोरदार पुनरागमन केले होते. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत स्कोअर ३-३ असा बरोबरीत होता, पण चौथ्या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनने गोल करून भारताला मागे ढकलले. ग्रेट ब्रिटनचा तो गोल निर्णायक ठरला आणि त्यांनी ४-३ अशा फरकाने कांस्यपदक जिंकले. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

ग्रेट ब्रिटनने १-० ची आघाडी बऱ्याच काळ टीकवली होती. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये सामन्यात चार गोल्स झाले. यापैकी ब्रिटनने एक गोल केला. तर भारताने अवघ्या नऊ मिनिटांमध्ये तीन गोल करत हाफ टाइममध्ये ३-२ ची आघाडी मिळवली. ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टर्समध्ये ३-३ ची बरोबर केल्याने अंतीम १५ मिनिटं महत्वाची ठरली. शेवटच्या १५ मिनिटांनंतर सामन्याचे अंतिम स्कोअरकार्ड ४-३ असा स्कोर होता आणि ग्रेट ब्रिटनने सामना जिंकला. सामना संपल्यानंतर भारतीय महिला खेळाडू निराश होऊन मैदानातच आहेत त्या जागी बसल्या. त्यानंतर ब्रिटनने खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले आहे.

भारतीय संघाच्या पराभवानंतर खेळाडू मैदानामध्येच रडू लागल्या. भारतीय संघाची गोलकीपर सविता पुनियाला मैदानातच रडू आलं. त्यानंतर ब्रिटनच्या महिला खेळाडूंनी भारतीय महिलांना धीर दिला. ग्रेट ब्रिटनच्या हॉकी संघाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुनी भारतीय संघाच्या खेळाचं कौतुक करण्यात आलं आहे.

“काय आश्चर्यकारक खेळ, काय अप्रतिम प्रतिस्पर्धी. हॉकी इंडिया तुम्ही टोक्यो २०२० मध्ये काहीतरी विशेष केले. पुढील काही वर्षे खूप उज्ज्वल दिसत आहेत,” असे ट्विट ग्रेट ब्रिटनकडून करण्यात आलं आहे. भारतीय संघाने देखील ट्विटला उत्तर तो एक शानदार खेळ होता. कांस्यपदकाबद्दल अभिनंदन असे म्हटले आहे.

चुरशीच्या लढतीत भारत ब्रिटनकडून ३-४ ने पराभूत

रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोलशून्य बरोबरीनंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये तब्बल पाच गोल झाले. ब्रिटनने १-० ची आघाडी बऱ्याच काळ टीकवली होती. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये सामन्यात चार गोल्स झाले. यापैकी ब्रिटनने एक गोल केला. तर भारताने अवघ्या नऊ मिनिटांमध्ये तीन गोल करत हाफ टाइममध्ये ३-२ ची आघाडी मिळवली. ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टर्समध्ये ३-३ ची बरोबर केल्याने अंतीम १५ मिनिटं महत्वाची ठरली.