Father’s Day : ‘बाप’ माणूस झालेला अजिंक्य रहाणे सांगतोय आपल्या नवीन जबाबदारीबद्दल…

मुलीसोबतचा प्रत्येक क्षण एन्जॉय करतोय !

संपूर्ण जगभरात आज फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. प्रत्येक घरात वडिलांचं स्थान महत्वाचं मानलं जातं. आई आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करत असते, तर बाबा आपल्या परिवारातील सदस्यांना कोणताही त्रास होणार नाही…याची काळजी घेत असतात. प्रसंगी कठोर भूमिका घेत आपल्या मुलांना योग्य वळणावर आणण्यासाठी कडक भूमिका घेणारे बाबा प्रत्येकासाठी हिरो असतात. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेही काही महिन्यांपूर्वी बाबा बनला आहे. अजिंक्य आणि त्याची पत्नी राधीकाने आपल्या मुलीचं नाव आर्या असं ठेवलं असून मुलीसोबत खेळतानाचे फोटो, व्हिडीओ अजिंक्य सोशल मीडियावर शेअर करत असतो.

बाप झाल्यानंतर कसं वाटतं, काय जबाबदाऱ्या असतात याबद्दल माहिती सांगणारा एक छोटासा व्हिडीओ अजिंक्यने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. मुलीचे डायपर बदलण्यापासून तिच्याशी खेळण्यापर्यंत सर्व गोष्ट मी एन्जॉय करतोय असं अजिंक्य म्हणाला….

नवीन वर्षात भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात अजिंक्य रहाणे सहभागी झाली होता. या कसोटी मालिकेत अजिंक्यने आश्वासक कामगिरी केली होती. यानंतर आयपीएलच्या तेराव्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार होता, मात्र करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे.

अवश्य वाचा – बाबांनी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं, अजिंक्यने शेअर केला बाबांसोबत लहानपणीचा फोटो

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: On fathers day ajinkya rahane share his experience after becoming father and his experience psd