ओस्ट्राव्हा : भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने चीनच्या शुआई झांगसोबत खेळताना ओस्ट्राव्हा खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यंदाच्या हंगामातील सानियाचे हे पहिलेचे जेतेपद ठरले.

सानिया आणि शुआई या दुसऱ्या मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात केटलिन क्रिस्टियन आणि एरिन रूटलिफ या जोडीवर ६-३, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली. तिसऱ्या मानांकित क्रिस्टियन आणि रूटलिफ या जोडीला अंतिम सामन्यात फारशी झुंज देता आली नाही. सानियाचे हे कारकीर्दीतील ४३वे डब्ल्यूटीए जेतेपद ठरले. यंदाच्या मोसमात अंतिम फेरीमध्ये खेळण्याची सानियाची ही दुसरी वेळ होती. याआधी डब्ल्यूटीए २५० क्लीव्हलंड स्पर्धेत अमेरिकेच्या क्रिस्टिना मकहेलसोबत खेळताना तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

ओस्ट्राव्हा खुली टेनिस स्पर्धा