Mohammed Siraj Statement: भारतीय संघाने आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत असं काही करून दाखवलं, जे इतर कुठल्याही संघाला करता आलं नव्हतं. स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २५६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ९६ धावांनी आपल्या नावावर केला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. या विजयात सर्व खेळाडूंनी मोलाचं योगदान दिलं आहे. मोहम्मद सिराजला या स्पर्धेत एक सामना खेळण्याची संधी मिळाली. दरम्यान वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्याने असं काही म्हटलं, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मोहम्मद सिराज नेमकं काय म्हणाला?
वर्ल्डकप जिंकल्यानंतर, सर्व ब्रॉडकास्टर्स खेळाडूंची मुलाखत घेत होते. त्यावेळी मोहम्मद सिराजला देखील प्रश्न विचारण्यात आला. मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवला विचारण्यात आलं की, या विजयात तुमच्या दोघांचं किती योगदान होतं? यावर मजेशीर उत्तर देताना मोहम्मद सिराज म्हणाला, “हो खूप मोठं योगदान आहे, बाहेर बसून, धावत जाऊन आम्ही पाणी पाजलं आहे…” हा इतकाच व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण सिराजने पहिल्या सामन्यात दमदार गोलंदाजी केली होती. त्यानंतर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिल्याने सिराजला संधी मिळाली नाही.
संघात असणं आणि वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग असणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. टीम मॅनेजमेंट परिस्थिती पाहून खेळाडूंना संधी देत असते. सिराज उत्तम गोलंदाज पण पण बुमराह आणि अर्शदीप संघात असताना त्याला संधी मिळणं कठीण होतं. पण त्याला जी जबाबदारी दिली गेली ती त्याने योग्यरित्या पार पाडली. आता तो दुसऱ्यांदा टी -२० वर्ल्डकप चॅम्पियन बनला आहे.
तर वरुण चक्रवर्तीसारखा नंबर १ फिरकी गोलंदाज संघात असताना कुलदीप यादवलाही आपल्या संधीची वाट पाहावी लागली. सेमी फायनलमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर वरुण चक्रवर्तीला बाहेर करून कुलदीप यादवला संधी मिळणार अशी चर्चा रंगली होती. पण सूर्याने वरुणला संधी दिली. वरुणने या संधीचं सोनं केलं.
