पाकिस्तानने यंदाच्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा ३२ धावांनी पराभव केला आहे. या पराभवासह पाकिस्तानने टी-२० विश्वचषक २०२४ मधील पराभवाचा बदला घेतला आहे. पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी केली. तर साहिबजादा फरहान व बाबर आझम यांनी चांगली फलंदाजी केली. याशिवाय आपल्या गोलंदाजी अॅक्शनमुळे चर्चेत असलेल्या उस्मान तारिकने ३ विकेट्स घेतल्या. तर या सामन्यात अमेरिकेचा वेगवान गोलंदाज व्हॅन शाल्कविकने ४ विकेट्स घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली.
पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील सामना सिंहालेसे स्पोर्ट्स क्लब कोलंबोमध्ये हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १९० धावा केल्या. तर प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ २० षटकांत धावा करू शकला आणि परिणामी संघाला टी-२० वर्ल्डकपमधील सलग दुसरा सामना गमवावा लागला आहे. तर अमेरिका सलग दोन सामने जिंकत गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे.
पाकिस्तानने दिलेल्या १९१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरूवात चांगली झाली. पण मधल्या षटकांमध्ये पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी सामन्यावर पकड घट्ट केली. शायन जहांगीरने ३४ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावा केल्या. तर अँड्रियू गौस १३ धावांवर बाद झाला. यानंतर मिलिंद कुमारने चांगली फलंदाजी केली, पण तो २९ धावांवर झेलबाज झाला. यानंतर शुभम रांजणेने कमालीची फटकेबाजी केली. शुभमने या सामन्यात ३० चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. तर बाकीचे इतर फलंदाज फेल ठरले.
पाकिस्तानकडून उस्मान तारिकने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर शादाब खानने २ विकेट्स, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रीदी व अबरार अहमद यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सावध सुरूवात केली. पण सयम अयुब १९ धावा करत झेलबाद झाला. यानंतर साहिबजादा फरहानने ४१ चेंडूत ६ चौकार व ५ षटकारांसह ७३ धावांची शानदार खेळी केली. तर बाबर आझमने ३२ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ४६ धावा केल्या. तर शादाब खानने १२ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ३० धावांची खेळी केली. यासह पाकिस्तानने ९ बाद १९० धावा केल्या.
अमेरिकेकडून व्हॅन शाल्कविकने ४ षटकांत २५ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. शाल्कविक आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्ससह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. तर सौरभ नेत्रावळकर, मोहम्मद मोहसीन, हरमीत सिंग यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.

