पाकिस्तानचे क्रिकेटपटू ‘त्या’ शाळेला भेट देणार

संपूर्ण जगाला सुन्न करणाऱया पेशावरीलमधील तालिबान्यांच्या हल्ल्यात उध्वस्त झालेल्या लष्कराच्या शाळेला पाकिस्तानचे क्रिकेटपटू भेट देणार आहेत.

Shahid Afridi
ICC T20 World Cup: Shahid Afridi

तालिबान्यांनी पेशावरमधील लष्करी शाळेतील चिमुकल्यांवर केलेल्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाकिस्तानचे क्रिकेटपटू या शाळेला भेट देणार आहेत. पाकिस्तानचा संघ सध्या दुबईत न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे.
फोटो गॅलरी: काय घडले पेशावरमधील ‘त्या’ शाळेत?
मायदेशी परतल्यानंतर संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने संघासह या शाळेला भेट देण्याची व्यक्त केली. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) याला मान्यता दिली आहे.

एकदिवसीय सामना पुढे न ढकलल्याने पीसीबीवर टीका
दुबई : देशात घडलेल्या भीषण हल्यानंतर बळी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्याकरिता पीसीबीला न्यूझीलंडविरुद्धचा चौथा एकदिवसीय सामना पुढे ढकलण्याची संधी होती. मात्र तसे न केल्याने पीसीबीवर सर्व स्तरातून टीका होत आहे. माजी खेळाडू, संघटक यांनी मंडळावर खरमरीत टीका केली आहे. दरम्यान, प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीशी झालेला करार लक्षात घेऊन एकदिवसीय पुढे ढकलली नसल्याचे स्पष्टीकरण पीसीबीने दिले आहे.

फोटो गॅलरी: निष्पाप जीवांना विद्यार्थ्यांची श्रध्दांजली!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pak cricketers to visit terror hit army school in peshawar