Basit Ali Suggestion to PCB: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात २ कसोटी सामन्यांची क्रिकेट मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव करत इतिहास घडवला आणि कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानला पराभूत करण्याचा पराक्रम केला. पाकिस्तानच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या पराभवासाठी चाहते आणि माजी खेळाडू दोघेही पाकिस्तानी संघावर ताशेरे ओढत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीनेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) सल्ला दिला आहे.

हेही वाचा – Ravindra Jadeja Wife: रवींद्र जडेजाची आमदार पत्नी कंबरेभर पाण्यात उतरून करतेय लोकांची मदत, जडेजाच्या कमेंटनेही वेधलं लक्ष, पाहा VIDEO

बासित अलीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारताची नक्कल करण्याचा सल्ला दिला आहे, तर पाकिस्तानातील क्रिकेट अधिक चांगले होऊ शकेल, असा सल्ला दिला आहे. दुलीप ट्रॉफीप्रमाणेच खेळाडूंचा एक पूल तयार करून त्यांना कसोटी सामने खेळण्याची संधी दिली पाहिजे. बासित अलीने बांगलादेश कसोटीनंतर चॅम्पियन्स लीग सुरू करण्याच्या पीसीबीच्या निर्णयावरही नाराजी व्यक्त केली. म्हणाले, कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण, पाकिस्तानकडे या फॉरमॅटमध्ये अधिक चांगले क्रिकेटपटू नाहीत.

पाकिस्तानात कसोटी मालिकेनंतर चॅम्पियन्स कप स्पर्धा खेळवली जाणार आहे, जी एकदिवसीय स्पर्धा असेल. तर भारतात आता दुलीप ट्रॉफी खेळवली जाणार आहे, जो ४ दिवसीय कसोटी सामना असेल. बासित अली यांनी सांगितले की, पाकिस्तानने भारताचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारत जे करत आहे त्याचे अनुकरण करून फायदा होईल. दुलीप ट्रॉफीद्वारे भारत त्यांचा पाया मजबूत करण्यावर भर आहे. त्यामुळे भारत यशस्वी होत आहे. पाकिस्तानला हे भारताकडून शिकण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Kamran Akmal : कोहली-रोहितबद्दल कामरान अकमलचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “पाकिस्तानमध्ये विराटपेक्षा जास्त तर…”

पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू बासित अलीने युट्युब चॅनेलवर सांगितले, कसोटी मालिकेनंतर पाकिस्तानात चॅम्पियन्स कप खेळवला जाणार आहे. पाकिस्तानने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांच्या रणनिती कॉपी केल्या आहेत, पण भारत तर आपला शेजारी देश आहे, त्यांनी भारताकडे बघून त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण कॉपी करण्यासाठीही हुशारी लागते. भारतीय संघ जे करतोय याचं फक्त अनुकरण करा. भारतात आता दुलीप ट्रॉफी खेळवली जाणार आहे, ही टूर्नामेंट टी-२० किंवा वनडे आहे का? ही स्पर्धा ४ दिवसीय कसोटी सामना आहे. भारतीय संघ त्यांचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यामुळेच ते यशस्वी आहेत.

हेही वाचा – Lakshya Sen-Deepika Padukone: दीपिका पदुकोणने का केला लक्ष्य सेनला फोन? त्यानेच स्पष्ट केलं कारण

दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघात बदल

बांगलादेशविरुद्ध रावळपिंडी येथे ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने आपला १२ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या नावाचा समावेश नाही. पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी आफ्रिदीला वगळण्याबाबत काहीही वक्तव्य केले नाही, परंतु तो त्याच्या गोलंदाजीत काही गोष्टींवर काम करत असल्याचे सांगितले. लेगस्पिनर अबरार अहमदसह वेगवान गोलंदाज मीर हमजाचा संघात समावेश करण्यात आला आहे.