पाकिस्तान विरुद्ध रावळपिंडी येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ६५७ धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी ज्याप्रकारे वर्चस्व गाजवले ते पाहून पाकिस्तान क्रिकेट बोर्डही चव्हाट्यावर आले आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने नसीम शाहला सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळपट्टीबाबत विचारले असता तो संतापला. पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकाराला असे उत्तर दिले की उपस्थित सर्वजण हसू लागले. मात्र नंतर पत्रकारानेही त्याला सडेतोड उत्तर दिले. नसीमने इंग्लंडच्या पहिल्या डावात २४ षटके गोलंदाजी करताना १४० धावा दिल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानी पत्रकाराने नसीम शाहला विचारले की, फैसलाबादमध्ये ४० वर्षांपूर्वी अशीच खेळपट्टी होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज डेनिस लिलीने गोलंदाजी करताना म्हटले होते की, जेव्हा मी मरेन, तेव्हा मला या विकेटवर पुरले जावे. तर मग तुम्हाला काय वाटते ही विकेट काहीशी तशी आहे का? यावर उत्तर देताना नसीम शाह म्हणाला, ”सर, तुम्ही पण मला मारण्याचा प्रयत्न करत आहात का? मी आता का मरावे असे तुम्हाला वाटते?”

त्यानंतर पत्रकार म्हणाला, अल्लाहने असे करु नये. दरम्यान यावेळी पत्रकारक जोर देताना म्हणाला, ”नसीम शाह, तुम्ही माझे ऐका. तुम्ही माझ्या सलवार कमीजवर जाऊ नका, की मी नवीन आलोय. तुमचा जन्मही झाला नसल्यापासून मी खेळ कव्हर करत आहे.” अशा प्रकारे पत्रकार आणि नसीम शाह यांच्यात खडाजंगी पाहीला मिळाली.

हेही वाचा – PAK vs ENG 1st Test: इंग्लंडला मोठा धक्का; लियाम लिव्हिंगस्टोन पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, जाणून घ्या कारण

पहिल्या कसोटी सामन्याबद्धल बोलायचे, तर त्यांच्या दोन डावात अनुक्रमे ६५७ आणि २६४ धावा केल्यानंतर इंग्लंडने चौथ्या डावात पाकिस्तानसमोर विजयासाठी ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले. याआधी पाकिस्तानचा संघही पहिल्या डावात ५७९ धावा करू शकला होता. पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात ६५ षटकांच्या समाप्तीनंतर ५ बाद २१४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर संघाला विजयासाठी अजून १२९ धावांची गरज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs eng 1st test naseem shah told a pakistani journalist why do you want me to die now vbm
First published on: 05-12-2022 at 15:36 IST