scorecardresearch

PAK vs ENG: उत्कंठावर्धक कसोटी क्रिकेट सामन्यातील इंग्लंडच्या खेळाडूंचा हा फोटो होतोय व्हायरल

पाकिस्तान विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ७४ धावांनी शानदार विजय मिळवला पण त्याआधी शेवटच्या सत्रातील क्षेत्ररक्षणाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

PAK vs ENG: उत्कंठावर्धक कसोटी क्रिकेट सामन्यातील इंग्लंडच्या खेळाडूंचा हा फोटो होतोय व्हायरल
सौजन्य- (ट्विटर)

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ७४ धावांनी पराभव केला. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात ६५७ धावा केल्या. यादरम्यान इंग्लिश संघाच्या चार फलंदाजांनी शतके झळकावली. यामध्ये जॅक क्रोली (१२२), बेन डकेट (१०७), ऑली पोप (१०८) आणि हॅरी ब्रूक (१५३) यांचा समावेश आहे.

प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात ५७९ धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने ११४, इमाम-उल-हकने १२१ धावा आणि कर्णधार बाबर आझमने १३६ धावा केल्या. अशाप्रकारे दुसऱ्या डावात इंग्लंड ७८ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरला. दुसऱ्या डावात इंग्लंडने सात गड्यांच्या मोबदल्यात २६४ धावा करून डाव घोषित केला. जो रूटने ७३ आणि हॅरी ब्रूकने ८७ धावा केल्या. त्याचवेळी जॅक क्रॉलीने ५० धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लिश संघाला एकूण ३४२ धावांची आघाडी मिळाली आणि संघाने पाकिस्तानसमोर ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

हेही वाचा  : बेन स्टोक्सचे कौतुक करताना इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन विराटच्या चाहत्यांकडून झाला ट्रोल

पाकिस्तानचा संघ पाचव्या दिवशी २६८ धावांवर गारद झाला. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात सौद शकीलने सर्वाधिक ७६ धावा केल्या. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात ओली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. जॅक लीच नसीम शाहने एलबीडब्ल्यू करत पाकिस्तानचा डाव गुंडाळला. त्याच सामन्यात इंग्लंडने शेवटच्या सत्रात सर्व खेळाडूंना फलंदाजाभोवती क्षेत्ररक्षणासाठी उभे केले होते. तब्बल १० खेळाडू घेराव घालून फलंदाजावर दबाव आणतानाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा  : IND vs PAK: भारताच्या कणखर भूमिकेपुढे रमीज राजा नरमला, वाटाघाटीसाठी आयसीसीकडे मागितली मदत

इंग्लंडचा संघ १७ वर्षांनंतर इंग्लंडच्या दौऱ्यावर येत असून याआधीच त्यांनी कसोटी जिंकली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या १७ वर्षांत एकही संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला नव्हता. इंग्लंडला २२ वर्षांनंतर मायदेशात पाकिस्तानविरुद्ध कसोटी जिंकण्यात यश आले आहे. इंग्लिश संघाने पाकिस्तानमध्ये शेवटची कसोटी २००० साली जिंकली होती. त्यानंतर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने कराचीमध्ये पाकिस्तानचा सहा विकेट्स राखून पराभव करत मालिका १-० अशी जिंकली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 16:59 IST

संबंधित बातम्या