scorecardresearch

PAK vs ENG 1st Test: इंग्लंडला मोठा धक्का; लियाम लिव्हिंगस्टोन पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, जाणून घ्या कारण

पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात ६५ षटकांच्या समाप्तीनंतर ५ बाद २१४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर संघाला विजयासाठी अजून १२९ धावांची गरज आहे.

PAK vs ENG 1st Test: इंग्लंडला मोठा धक्का; लियाम लिव्हिंगस्टोन पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, जाणून घ्या कारण
इंग्लंडचा अष्टपैलू लियाम लिव्हिंगस्टोन. (संग्रहित छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

पाकिस्तान आणि इंग्लंड संघात तीन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड कसोटी संघाला मोठा धक्का बसला आहे. लियाम लिव्हिंगस्टोन दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. लिव्हिंगस्टोनच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो उर्वरित कसोटी सामने खेळू शकणार नाही.

स्टार अष्टपैलू लिव्हिंगस्टोनने आपल्या कसोटी कारकिर्दीला रावळपिंडी सामन्यातून सुरुवात केली. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी, सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. पाकिस्तानच्या पहिल्या डावात तो क्षेत्ररक्षणासाठी आला नव्हता. रविवारी त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले. आता तो मंगळवारी (६ डिसेंबर) घरी परतणार आहे.

लियाम लिव्हिंगस्टोनने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात फलंदाजीची सुरुवात केली आणि नाबाद सात धावा केल्या. परंतु तो विकेटच्या दरम्यान धावत असताना तो स्पष्टपणे अस्वस्थ असलेला दिसत होता. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात ९ धावा केल्या होत्या. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) एका निवेदनात म्हटले आहे की, “इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.”

ईसीबीने सांगितले की, “तो मंगळवारी यूकेला परत येईल आणि अनुक्रमे ईसीबी आणि लँकेशायर वैद्यकीय संघासोबत पुनर्वसन सुरू करेल.” लिव्हिंगस्टोनची जागी कोणाला संधी घ्यायची की नाही हे इंग्लंड संघाने ठरवलेले नाही. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुलतान येथे ९ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – Abu Dhabi T10 League 2022: डेक्कन ग्लॅडिएटर्सने न्यूयॉर्क स्ट्रायकर्सवर मात करून दुसऱ्यांदा पटकावले विजेतेपद

पहिल्या कसोटी सामन्याबद्धल बोलायचे, तर त्यांच्या दोन डावात अनुक्रमे ६५७ आणि २६४ धावा केल्यानंतर इंग्लंडने चौथ्या डावात पाकिस्तानसमोर विजयासाठी ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले. याआधी पाकिस्तानचा संघही पहिल्या डावात ५७९ धावा करू शकला होता. पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात पाकिस्तान संघाने दुसऱ्या डावात ६५ षटकांच्या समाप्तीनंतर ५ बाद २१४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर संघाला विजयासाठी अजून १२९ धावांची गरज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 14:41 IST

संबंधित बातम्या