पाकिस्तानविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने अनेक विक्रम केले आहेत. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ५०० हून अधिक धावा करत विश्वविक्रम केला आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ५०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा इंग्लंड संघ जगातील पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी १९१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाने ४९४ धावांचा डोंगर उभा केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी खेळणाऱ्या इंग्लंड संघाने हा सामना संस्मरणीय बनवला. त्याने एक-दोन नव्हे तर एकूण ७ विश्वविक्रम केले आणि एक एक करून अनेक विक्रम केले.

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ५०० हून अधिक धावा

इंग्लंड संघाने कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ५०६ धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ५०० धावांचा टप्पा पार करणारा ते जगातील पहिला संघ ठरला आहे. याशिवाय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्या दिवशी चार खेळाडूंनी शतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतर विक्रमांबद्दल बोलायचे तर, कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात सर्वाधिक 174 धावा करण्याचा विश्वविक्रमही इंग्लंडच्या नावावर आहे. त्याच वेळी, जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी मिळून सर्वात जलद द्विशतक भागीदारीचा विश्वविक्रम केला.

इंग्लंडच्या विक्रमांची यादी इथेच संपत नाही. जॅक क्रॉलीने ८६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि कसोटीत इंग्लंडसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा सलामीवीर बनला. त्याचवेळी हॅरी ब्रूक हा कसोटीत सर्वात जलद शतक झळकावणारा इंग्लंडचा तिसरा खेळाडू ठरला. हॅरी ब्रूक आणि बेन डकेटनेही या सामन्यात आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

हेही वाचा :   मी पुन्हा येईन! बरखास्त केलेल्या निवड समितीच्या अध्यक्षांनी परत त्याच पदासाठी केला अर्ज

स्टोक्स आणि ब्रूक नाबाद

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून इंग्लंड संघ प्रथम फलंदाजीला उतरला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ४ गडी गमावून ५०६ धावा केल्या. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी २१६ चेंडूत २३३ धावांची विक्रमी भागीदारी केली. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपापली शतके पूर्ण केली. दोघे बाद झाल्यानंतर ओली पोप आणि त्यानंतर कारकिर्दीतील दुसरा सामना खेळणाऱ्या हॅरी ब्रूकनेही शतके झळकावली. चार शतकांच्या जोरावर इंग्लंडने रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या दिवशी अवघ्या ७५ षटकांत ४ गडी गमावून ५०६ धावा जोडल्या. ब्रूक ८१ चेंडूत १०१ धावा करून नाबाद परतला आणि बेन स्टोक्सने १५ चेंडूत ३४ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs eng pakistani bowlers unable to stop english batsman and they made 7 world records in first test match at rawalpindi avw
First published on: 01-12-2022 at 21:50 IST