इंग्लंड आणि पाकिस्तान संघात सध्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिका खेळली जात. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तावर ७४ धावांनी पराभव मात केली. त्याचबरोबर इंग्लंडने पाकिस्तानमध्ये २२ वर्षांनी कसोटी जिंकली आहे. त्यामुळे या विजयानंतर जगभरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या बचावात्मक दृष्टिकोनामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, आता शोएब अख्तर रमीझ राजावर भडकला आहे.

शोएब अख्तरने रावळपिंडी कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना, रमीझ राजाला फटकारले आहे. अख्तर म्हणाला, तुम्ही चेअरमन असून चांगली खेळपट्टी बनवणार नाही, तर कोण बनवणार. विशेष म्हणजे रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने विक्रमी ५०६ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्यांच्याकडून चार शतके झळकली होती.

Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना शोएब अख्तर म्हणाला, “चेअरमन स्वत: म्हणत आहेत की आम्ही चांगली विकेट बनवायला हवी होती आणि इंग्लंडने चांगली फलंदाजी केली. अरे भाऊ, तुम्ही चेअरमन आहात, तुम्हाला चांगली खेळपट्टी बनवण्याचा अधिकार आहे.”

हेही वाचा – AUS vs WI Test Series: पॅट कमिन्स दुखापतीमुळे बाहेर, ‘हा’ खेळाडू पुन्हा सांभाळणार ऑस्ट्रेलियाची धुरा

रमीझ राजाला फटकारण्याबरोबरच अख्तरने पाकिस्तानी संघावरही टीका केली. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना अख्तर म्हणाला, ”या सामन्यात पाकिस्तानने संधी घेतली नाही. हे खूप खेदजनक आहे. माझ्या मते इंग्लंडने पाकिस्तानला संधी दिली होती. इंग्लंडने म्हटले की तुम्ही तुमचा कसोटी सामना वाचवा, आम्ही कसोटी क्रिकेट वाचवतो. तुम्ही तुमच्या संघात जागा वाचवा. पण पाकिस्तानने या संधीचा फायदा उठवला नाही. हा फरक मानसिकतेचा आहे. पाकिस्तानची ही स्थिती असती तर त्यांनी डाव घोषित केला असता का? कधीही केले नसते.”

पाकिस्तानी संघाला सध्या अनेक माजी खेळाडूंच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे, हे उघड आहे. अशा स्थितीत आता जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा मुलतान कसोटीवर खिळल्या आहेत, कारण मुलतानमधील अशीच खेळपट्टी त्यांना पाहायला मिळाली तर पाकिस्तानी संघाचे काय होणार हे देवालाच ठाऊक. दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना मुलतान येथे ९ आणि १३ डिसेबरला खेळला जाणार आहे.