Asia Cup 2022 : आशिया चषकात आज पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग यांच्यात सामना होणार आहे. साखळी फेरीतील हा शेवटाच सामना असून हा सामना जिंकून सुपर ४ मध्ये आपले स्थान पक्के करण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल. दरम्यान, आज जो संघ जिंकेल, तो सुपर ४ मध्ये पोहोचणार आहे. यापूर्वी अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका हे तीन संघ सुपर ४ मध्ये पोहोचले आहेत.

हेही वाचा – Asia Cup 2022 : ड्रेसिंग रुममधून दिलेल्या संदेशाबाबत श्रीलंकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा, म्हणाले, “तो संदेश…”

कोणाचे पारडे जड?

आशिया चषकात पाकिस्तानने आपला पहिला सामना भारताबरोबर खेळला होता. मात्र, या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला होता. तर हॉंगकॉंगला भारताने धुळ चारली होती. मात्र, या सामन्यात हॉंगकॉंगने कडवी झूंज दिली होती. त्यामुळे हॉंगकॉंगच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यापूर्वी आशिया चषकात हे दोन्ही संघ दोनदा आमने सामने आले आहेत. या दोन्ही सामन्यात पाकिस्ताने विजय मिळवला आहे.

हेही वाचा – SL vs BAN सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेकडून रडीचा डाव? ड्रेसिंग रुममधून कोड्स वापरुन दिली माहिती; चाहते संतापून म्हणाले, “मग मैदानात…”

अंदाजे प्लेईंग ११ –

पाकिस्तान : बाबर आझम ( कर्णधार ), मोहम्मद रिझवान ( यष्टीरक्षक), फखर झमन, आसिफ अली, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहनी

हाँगकाँग : निजाकत खान ( कर्णधार ), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाझ खान, स्कॉट मॅकेचनी ( यष्टीरक्षक), झिशान अली, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर