WI vs SCO, ICC T20 World Cup 2026 Match 2: बहुप्रतिक्षित टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला आज ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेतील दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर स्कॉटलंडला ही स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने १८२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडला १४७ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह वेस्ट इंडिजने हा सामना ३५ धावांनी आपल्या नावावर केला.

Live Updates

Pakistan vs Netherlands Live Score, ICC T20 World Cup 2026: पाकिस्तान आणि नेदरलँड्स टी-२० विश्वचषक सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

18:49 (IST) 7 Feb 2026

WI vs SCO: वेस्ट इंडिजचा स्कॉटलंडवर दमदार विजय! हेटमायर ठरला विजयाचा हिरो

या सामन्यात वेस्ट इंडिजने स्कॉटलंडविरूद्ध खेळताना १८३ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा बचाव करताना वेस्ट इंडिजने ३५ धावांनी विजय मिळवला आहे.

18:25 (IST) 7 Feb 2026

WI vs SCO: W,W,W... शेफर्डची हॅट्रिक! वेस्ट इंडिज विजयाच्या उंबरठ्यावर

या सामन्यात गोलंदाजी करताना रोमारियो शेफर्डने हॅट्रिक घेतली आहे.

18:02 (IST) 7 Feb 2026

WI vs SCO: स्कॉटलँडला चौथा धक्का!

स्कॉटलँडला चौथा धक्का बसला आहे. कर्णधार बेरिंगटन ४२ धावांची खेळी करून माघारी परतला आहे.

17:15 (IST) 7 Feb 2026
WI vs SCO: शेफर्डचा भन्नाट बॉल अन् स्कॉटलँडला दुसरा मोठा धक्का

या सामन्यातील पाचव्या षटकत स्कॉटलँडला दुसरा मोठा धक्का बसला आहे. मॅकमूलन स्वस्तात माघारी परतला आहे.

17:05 (IST) 7 Feb 2026

WI vs SCO: स्कॉटलँडला पहिला मोठा धक्का

या सामन्यात १८३ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या स्कॉटलँडला पहिला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज मायकल जोन्स अवघ्या ७ धावा करत माघारी परतला.

16:43 (IST) 7 Feb 2026

WI vs SCO: हेटमायरचं दमदार अर्धशतक! वेस्ट इंडिजने स्कॉटलँडसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना वेस्ट इंडिजकडून शिमोरन हेटमायरने दमदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने २० षटकांअखेर १८२ धावा केल्या आहेत. स्कॉटलँडला हा सामना जिंकण्यासाठी १८३ धावांची गरज आहे.

16:35 (IST) 7 Feb 2026

WI vs SCO: वेस्ट इंडिजला चौथा मोठा धक्का! अर्धशतकी खेळी करून हेटमायर परतला माघारी

वेस्ट इंडिजला चौथा धक्का बसला आहे. अर्धशतकी खेळी करून शिमरोन हेटमायर माघारी परतला आहे.

15:42 (IST) 7 Feb 2026

WI vs SCO: वेस्ट इंडिजला दुसरा धक्का!

वेस्ट इंडिजला दुसरा धक्का बसला आहे. शे होप बाद झाल्यानंतर, ब्रेंडन किंग ३५ धावा करून माघारी परतला आहे.

14:33 (IST) 7 Feb 2026

पाकिस्तानचा नेदरलँड्सवर अखेरच्या षटकात विजय, १९वं षटक ठरलं विजयाचा टर्निंग पॉईंट; टी-२० वर्ल्डकपमध्ये उघडलं खातं

PAK vs NED: पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात टी-२० विश्वचषक २०२६ मधील पहिला सामना खेळवला गेला. ...सविस्तर वाचा
14:33 (IST) 7 Feb 2026

१९व्या षटकात कुटल्या २४ धावा

फहीम अश्रफने १९व्या षटकात २४ धावा कुटत सामना पाकिस्तानच्या बाजूने वळवला.

14:07 (IST) 7 Feb 2026
पाकिस्तानने गमावली सहावी विकेट

१६व्या षटकात क्लाईनने मोहम्मद नवाजला बाद करत संघाला अजून एक विकेट मिळवून दिली. गेले ३१ चेंडू एकही बाऊंड्री न गेल्याने पाकिस्तानचे फलंदाज धावा करण्यासाठी झटत होते, याच प्रयत्नात मोहम्मद नवाज मोठा फटका खेळला आणि झेलबाद होत माघारी परतला. तर १७व्या षटकातील पहिल्या चेंडूवर शादाब खान झेलबाद झाला. यासह आता पाकिस्तानला २३ चेंडूत ३४ धावांची गरज आहे.

14:02 (IST) 7 Feb 2026

पाकिस्तानला विजयासाठी किती धावांची गरद

पाकिस्तानला आता विजयासाठी ५ षटकांत म्हणजेच ३० चेंडूत ३७ धावांची गरज आहे.

13:51 (IST) 7 Feb 2026
बाबर आझम झेलबाद

बाबर आझम मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात १३व्या षटकात झेलबाद झाला. यासह पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतला. पाकिस्तानला ४२ चेंडूत ४६ धावांची गरज आहे.

13:40 (IST) 7 Feb 2026

साहिबजादा फरहान झेलबाद

वीन मीकरनने १२व्या षटकात वादळी फलंदाजी करत असलेल्या साहिबजादा फरहानला झेलबाद करत संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. साहिबजादा ४७ धावांवर झेलबाद झाला.

13:33 (IST) 7 Feb 2026

१० षटकांत पाकिस्तानने किती धावा केल्या?

साहिबजादा फरहान आणि बाबर आझमची जोडी मैदानावर असून पाकिस्तानने १० षटकांत २ विकेट्स गमावत ९० धावा केल्या आहेत. यासह पाकिस्तानला विजयासाठी ५० चेंडूत ५८ धावांची गरज आहे.

13:10 (IST) 7 Feb 2026

आर्यन दत्तच्या खात्यात पहिली विकेट

आर्यन दत्तने पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर कर्णधार सलमान अली आघाने मोठा फटका खेळताना विकेट गमावली. कर्णधार व साहिबजादा यांनी संघाचा डाव सावरला होता आणि ५ षटकांच्या आधीच ५० धावा पूर्ण केलेल्या. पण सातत्याने फटके मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. यासह पाकिस्तानने ५ षटकांत २ बाद ५३ धावा केल्या आहेत.

12:58 (IST) 7 Feb 2026
नेदरलँड्सच्या खात्यात पहिली विकेट

तिसऱ्या षटकात आर्यन दत्तने चौथ्या चेंडूवर सयम अयुबला झेलबाद करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. आर्यन दत्तच्या गोलंदाजीवर सुरूवातीला चांगली फटकेबाजी झाली, पण त्याने विकेट मिळवून दिलीच. आर्यन दत्त हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे, जो मूळचा पंजाबचा आहे.

12:57 (IST) 7 Feb 2026

पाकिस्तानची चांगली सुरूवात

सयम अयुब व साहिबजादा फरहानची जोडी 148 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरली आहे. पहिल्या 2 षटकांत दोघांनी 22 धावा कुटल्या आहेत.

12:37 (IST) 7 Feb 2026
नेदरलँड्स ऑलआऊट

पाकिस्तानने अखेरच्या षटकांमध्ये कमबॅक करत नेदरलँड्सला मोठी धावसंख्या उभारू दिल नाही. १९व्या षटकात शाहीन आफ्रीदीने अनुभवी व्हॅन जेक मर्व्हेला झेलबाद केलं. तर २०व्या षटकात सलमान मिर्झाने दोन विकेट्स घेत नेदरलँड्सला सर्वबाद केलं. नेदरलँड्सचा संघ १९.५ षटकांत १४७ धावा करू शकला. यासह पाकिस्तानला विजयासाठी १४८ धावांचं लक्ष्य दिलं आहे.

12:17 (IST) 7 Feb 2026

स्कॉट एडवर्ड्स झेलबाद

अबरार अहमदने १५व्या षटकात स्कॉट एडवर्ड्सला झेलबाद करत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. यासह नेदरलँड्सने १६ षटकांत ५ बाद १२७ धावा केल्या आहेत. तर पुढच्या षटकात सईम अयुबने संघाला अजून एक विकेट मिळवून दिली.

12:04 (IST) 7 Feb 2026

नेदरलँड्सच्या १०० धावा

नेदरलँड्स संघाने १३व्या षटकात १०० धावांचा आकडा पार केला. पण नवाजच्या षटकात नेदरलँड्सचा महत्त्वाचा खेळाडू बास डी लीडेने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली.

11:43 (IST) 7 Feb 2026

तिसरी विकेट

आठव्या षटकात अबरार अहमदने एकरमॅनला क्लीन बोल्ड करत संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. यासह ८ षटकांत नेदरलँड्ने ३ बाद ६५ धावा केल्या आहेत.

11:33 (IST) 7 Feb 2026

पॉवरप्ले

नेदरलँड्सने भले पॉवरप्लेमध्ये २ विकेट्स गमावल्या आहेत, पण संघाने चांगल फाईटबॅक करत पॉवरप्लेमध्ये ५० धावा केल्या आहेत.

11:26 (IST) 7 Feb 2026

बाबर शाहीनचा रिले कॅच

माईकल लेविट नवाजच्या पाचव्या षटकात मोठा फटका खेळायला गेला, पण बाबरने सीमारेषेजवळ झेल टिपला आणि सीमारेषेबाहेर जाण्याआधी चेंडू मैदानात फेकला, जो शाहीन आफ्रिकीदीने टिपत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली.

11:21 (IST) 7 Feb 2026

पाकिस्तानच्या खात्यात पहिली विकेट

सलमान मिर्झाने चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर नेदरलँड्सला पहिला धक्का दिला. मॅक्स ओडॉड पूल करायला गेला, पण बॅटची कड घेत चेंडू हवेत उंच उडाला आणि विकेटकिपर उस्मान खानने धावत जाऊन चांगला झेल टिपला.

11:20 (IST) 7 Feb 2026

नेदरलँड्सकडून प्रीमियम फास्ट बॉलरची धुलाई

मायकेल लेविटने शाहीन आफ्रीदीच्या पहिल्या षटकात दोन चौकार खेचले. त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने एक चौकार व एक षटकार लगावले. यासह तो २३ धावा करत खेळत आहे,

11:03 (IST) 7 Feb 2026

PAK vs NED Live: सामन्याला सुरूवात

पाकिस्तान आणि नेदरलँड्स सामन्याला सुरूवात झाली आहे. नेदरलँड्सकडून मायकेल लेविट, मॅक्स ओडॉड जोडी सलामीला उतरली आहे. तर पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. नेदरलँड्सने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत सामन्याला सुरूवात केली आहे.

10:57 (IST) 7 Feb 2026

वैभव सूर्यवंशीचा भोजपुरी गाण्यावर भन्नाट डान्स, U19 WC जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये असं केलं सेलिब्रेशन; VIDEO व्हायरल

Vaibhav Suryavanshi Dance: वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीसह टीम इंडियाने अंडर-१९ विश्वचषकाचे जेतेपद आपल्या नावे केले. या जेतेपदानंतर ड्रेसिंग रूममध्ये भोजपुरी गाण्यावर डान्स करतानाचा वैभवचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. ...सविस्तर वाचा
10:42 (IST) 7 Feb 2026

PAK vs NED Live: पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन

सईम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान आघा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान (यष्टीरक्षक), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन आफ्रिदी, सलमान मिर्झा, अबरार अहमद

10:41 (IST) 7 Feb 2026

T20 WC Live: नेदरलँड्सची प्लेईंग इलेव्हन

मायकेल लेविट, मॅक्स ओडॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), झॅक लायन कॅशेट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, काइल क्लेन, पॉल व्हॅन मीकरेन

West Indies vs Scotland ICC T20 World Cup 2026  Highlights: टी-२० विश्वचषक २०२५ मधील दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला.