scorecardresearch

Premium

PAK vs NEP: अवघ्या २३.४ षटकात नेपाळचा खुर्दा; आशिया चषकात पाकिस्तानची विजयी सलामी, तब्बल २३८ धावांनी दणदणीत विजय

PAK vs NEP, Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ची यजमान पाकिस्तानने शानदार सुरुवात केली असून नवख्या नेपाळचा २३८ धावांनी धुव्वा उडवला आहे. या सामन्यात बाबर आझम आणि इफ्तिकार यांनी शतके झळकावली.

PAK vs NEP: Pakistan started with a win in Asia Cup defeated Nepal by 238 runs in the first match
आशिया चषक २०२३ची यजमान पाकिस्तानने शानदार सुरुवात केली असून नवख्या नेपाळचा २३८ धावांनी धुव्वा उडवला आहे. सौजन्य- (ट्वीटर)

PAK vs NEP, Asia Cup 2023: आशिया चषक स्पर्धेच्या १६व्या आवृत्तीला बुधवारी (३० ऑगस्ट) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानसमोर नेपाळचे आव्हान होते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने ५० षटकांत ६ बाद ३४२ धावा केल्या. त्याच्याकडून बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ १०४ धावांवर गारद झाला.

पाकिस्तानने आशिया कप २०२३ची सुरुवात विजयाने केली आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्यांनी नेपाळचा २३८ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत ६ गडी गमावून ३४२ धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने १५१ आणि इफ्तिखार अहमदने नाबाद १०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ २३.४ षटकांत १०४ धावांवर गारद झाला. पाकिस्तानचा पुढील सामना भारताविरुद्ध २ सप्टेंबरला खेळायचा आहे. त्याचबरोबर नेपाळचा पुढील सामना भारताविरुद्ध ४ सप्टेंबरला आहे.

Pakistan vs Netherlands Cricket Cricket World Cup 2023
PAK vs NED: पाकिस्तानने विश्वचषकाची विजयाने केली सुरुवात, पहिल्याच सामन्यात नेदरलँड्सचा ८१ धावांनी उडवला धुव्वा
Asian Games 2023: After squash India defeated Pakistan in hockey also defeated Pakistan 10-2 in a one-sided match
Asian Games, IND vs PAK Hockey: लहरा दो…! टीम इंडियापुढे पाकिस्तानने टेकले गुडघे, एकतर्फी सामन्यात १०-२ने भारताचा ऐतिहासिक विजय
Irfan Pathan's Post on X
IND vs PAK: ‘लगता है पड़ोसियों ने टीवी के साथ-साथ मोबाईल भी…’; भारताच्या विजयानंतर इरफान पठाणने पाकिस्तानींना केले ट्रोल
Team India video share from BCCI
IND vs PAK: ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंनी स्विमिंग पूलमध्ये केली मस्ती, कोहली-रोहितने केला डान्स, पाहा VIDEO

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. फखर जमानने १४ आणि इमाम-उल-हकने ५ धावा केल्या. यानंतर बाबर आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. रिझवान ५० चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने ४४ धावा करून धावबाद झाला. आघा सलमान ५ धावा करून संदीप लामिछानेचा बळी ठरला. यानंतर मुलतानमध्ये बाबर आणि इफ्तिखारचे वादळ पाहायला मिळाले.

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषकासाठी टीम इंडिया पोहोचली श्रीलंकेत, २ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध खेळणार महामुकाबला

बाबरने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १९वे शतक झळकावले. तो १३१ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १५१ धावा करून बाद झाला. दुसरीकडे त्याचा साथीदार इफ्तिखारने ६७ चेंडूत वन डे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. इफ्तिखारने ७१ चेंडूंत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०९ धावा केल्या. शादाब ४ धावा करून नाबाद राहिला. नेपाळकडून सोमपाल कामीने २ विकेट्स घेतल्या. त्याला करण केसी आणि लामिछाने यांना प्रत्येकी एक घेत मोलाची साथ दिली.

हेही वाचा:

प्रत्युत्तरात पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ यांनी नेपाळच्या आघाडीच्या फळीला उद्ध्वस्त केले. संघाने १४ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. कुशल भुरटेल ८ धावा, आसिफ शेख ५ धावा आणि कर्णधार रोहित पौडेल खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. नेपाळच्या पडझडीनंतर आरिफ शेख आणि सोमपाल कामी यांनी चौथ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. ती भागीदारी हारिसने तोडली, त्याने आरिफ शेखला क्लीनबोल्ड केले. शेखने ३८ चेंडूत २६ धावा केल्या आल्या. यानंतर हारिसने सोमपालला रिझवानकरवी झेलबाद केले. त्याला ४६ चेंडूत २८ धावा करता आल्या. त्यानंतर शादाब खानच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. त्याने चार विकेट्स घेत नेपाळच्या खालच्या फळीला गुंडाळले. गुलशन झा १३ धावांवर, दीपेंद्र सिंग ३ धावांवर, कुशल मल्ला ६ धावांवर बाद झाले, तर संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी यांना खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानकडून शादाबने चार विकेट्स घेतल्या. त्याला शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत मदत केली. नसीम शाह आणि मोहम्मद नवाज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pak vs nep nepal all out just 104 runs pakistans winning opening in the asia cup a resounding victory by as many as 238 runs avw

First published on: 30-08-2023 at 21:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×