scorecardresearch

PAK vs NZ 1st Test: कसोटी क्रिकेटमध्ये टीम साऊथीचा मोठा धमाका; ‘हा’ पराक्रम करणारा न्यूझीलंडचा ठरला तिसरा गोलंदाज

Tim Southee New Record: टीम साऊथी न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये ३५० विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. या अगोदर हा कारनामा हॅडली आणि व्हिटोरीने केला आहे.

PAK vs NZ 1st Test: कसोटी क्रिकेटमध्ये टीम साऊथीचा मोठा धमाका; ‘हा’ पराक्रम करणारा न्यूझीलंडचा ठरला तिसरा गोलंदाज
टीम साऊथीचा नवा विक्रम (संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम साऊदीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ३५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. कराची कसोटी सामन्यात पाकिस्तानचा पहिला डाव ४३८ धावांवर आटोपला. ज्यामध्ये साऊथीने ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याचवेळी एजाज पटेल, मायकेल ब्रेसवेल आणि इशान सोधीने २-२ विकेट घेतल्या.

आगा सलमान १०३ धावा करून बाद झाला. याशिवाय सर्फराज अहमदने ८६ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर पाकिस्तानला पहिल्या डावात ४३८ धावांपर्यंत मजल मारता आली. याशिवाय साऊथीने पाकिस्तानच्या डावात कसोटीत ३५० विकेट्स पूर्ण केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये ३५० विकेट्स घेणारा साऊथी न्यूझीलंडचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. हे करत साऊथीने रिचर्ड हेडली आणि डॅनियल व्हिटोरी यांच्या विक्रमांची बरोबरी केली आहे.

हॅडलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ४३१ विकेट घेतल्या आहेत, जो न्यूझीलंडसाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे, तर फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीने कसोटीत ३६१ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय साऊथीने आता कसोटीत ३५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

हेही वाचा – PAK vs NZ: ‘कॅप्टनसी कोण करतंय…’ लाइव्ह मॅचमध्ये रिझवान आणि सरफराजने एकसाथ केला डीआरएस घेण्याचा इशारा; पाहा व्हिडिओ

सामन्याबद्दल बोलायचे तर, पाकिस्तान संघाने पहिल्या डावात ४३८ धावा केल्या होत्या. आज पहिल्या कसोटीतील तिसरा दिवस आहे. न्यूझीलंड संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने १०६ षटकांत ४ बाद ३७७ धावा केल्या आहेत. पाकिस्तानकडून नौमान अली आणि अबरार अहमदने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 16:22 IST

संबंधित बातम्या