तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा ७९ धावांनी पराभव केला. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर बुधवारी (११ जानेवारी) झालेल्या या विजयासह किवी संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पाकिस्तानने पहिला एकदिवसीय सहा गडी राखून जिंकला. उभय संघांमधील मालिकेतील अंतिम सामना शुक्रवारी होणार आहे. दुसऱ्या सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. पाकिस्तानी खेळाडूने अंपायर अलीम दार यांच्याकडे चेंडू मारला, ज्यामुळे तो मैदानावर भडकला.

न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. डावाच्या ३६व्या षटकात हारिस रौफ गोलंदाजी करत होता. त्याचा चेंडू ग्लेन फिलिप्सने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. सीमारेषेवरून पुढे जाताना, मोहम्मद वसीम ज्युनियरने चेंडू उचलला आणि नॉन-स्ट्रायकरच्या टोकावर शॉट खेळला. त्याचा थ्रो अंपायर अलीम दार यांच्याकडे गेला. डार यांचा गुडघा दुखावला. तो वेदनेने ओरडू लागला. यामुळे तो संतप्त झाला आणि त्याने गोलंदाजाची जर्सी खाली फेकली.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनी कुठल्या दुखापतीसह खेळतोय? मुंबईविरूद्ध सामन्यानंतर सीएसकेच्या एरिक सिमन्स यांचे मोठे वक्तव्य
Kolkata Knight Riders Vs Lucknow Supergiants Match Updates in Marathi
KKR vs LSG : कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने जर्सीचा रंग का बदलला? जाणून घ्या
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल

पाकिस्तानी खेळाडूंनी अंपायर अलीम दार यांना शांत केले

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह अनेक गोलंदाज दारापर्यंत पोहोचले. कसे तरी त्यांना शांत केले. जिथे त्याला दुखापत झाली होती, तिथे खेळाडूही त्याची काळजी घेताना दिसत होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही हा व्हिडिओ शेअर केला आहे. अलीम दारला चेंडू लागताच तो वेदनेने विव्हळत होता आणि त्याने हारिस रौफचा हातातील स्वेटर रागात जमिनीवर फेकला. अलीम दारने हे सर्व मजेशीर स्वरात केले. तर पाकिस्तानी खेळाडू या घटनेचा आनंद लुटताना दिसले.

काय घडलं सामन्यामध्ये?

न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांत सर्वबाद २६१ धावांवर आटोपला. डेव्हन कॉनवेने ९२ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने १३ चौकार मारले. त्याच्या बॅटमधून एक षटकारही निघाला. कर्णधार केन विल्यमसनने १०० चेंडूत १० चौकारांच्या मदतीने 85 धावा केल्या. मिचेल सँटनरने ४० चेंडूत ३७ धावांचे योगदान दिले. किवी संघाच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने चार आणि नसीम शाहने तीन बळी घेतले. हरिस रौफ आणि उसामा मीर यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

हेही वाचा: IND vs SL 2nd ODI: “कधी कधी टॉस हारणे…” दुसऱ्या सामन्याआधी कर्णधार रोहित शर्माने केली मिश्किल टिप्पणी

२६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४३ षटकात १८२ धावांवर गारद झाला. कर्णधार बाबर आझमने ७९ धावांची खेळी खेळली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. मोहम्मद रिझवानने २८ आणि आघा सलमानने २५ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदी आणि ईश सोधीने प्रत्येकी दोन बळी घेतले. लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल आणि ग्लेन फिलिप्स यांना प्रत्येकी एक यश मिळाले.