पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदने चार वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने आपल्या बॅटने कौशल्य दाखवले. त्याने एकूण ३३५ धावा केल्या आणि त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. त्यानंतर एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे सरफराज अहमदने टीकेला सामोरे जावे लागले आहे.

सरफराजने पहिल्या कसोटीत ८६ आणि ५३ आणि दुसऱ्या सामन्यात ७८ आणि ११८ धावा केल्या. अशा पद्धतीने त्याने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकूण ३३५ धावा केल्या. यापूर्वी तो जानेवारी २०१९ मध्ये कसोटी सामना खेळला होता. सरफराजला त्याच वर्षी कर्णधारपद गमवावे लागले होते.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आयपीएलचे सर्व सीझन खेळलेल्या रोहित शर्माने रचला इतिहास, पंजाबविरूद्धचा सामना सुरू होताच हिटमॅनच्या नावे मोठी कामगिरी
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी जेव्हा सफराजने कठीण परिस्थितीत शतक ठोकले. तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. त्याचवेळी कर्णधार बाबर आझम, सलामीवीर इमाम-उल-हक आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफने उभे राहून टाळ्या वाजवल्या. बाबर आणि इमामच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका ट्विटर युजरने व्हिडिओ ग्रॅबचा वापर करून बाबरची खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा – ‘रख रख के देता है, आपको भी…’, पाकिस्तानी टीव्ही अँकरने कोहलीचे कौतुक करताना हारिसला केले ट्रोल, पाहा VIDEO

ट्विटर युजरचे म्हणणे आहे की, बाबरने शतकाचे सेलिब्रेशन खोटे केले. कारण त्याने २०१९ पासून सफराजला बेंचवर ठेवले आहे. युजरने लिहिले, ‘चार वर्षे पाणी पुरवणारा माणूस म्हणून ठेवले आणि आज अभिनय बघा. लाज नाही आणि लज्जा नाही. विशेष म्हणजे सरफराजनेही हे ट्विट लाईक केले आहे. मात्र, यावरून सर्फराजला टीकेला सामोरे जावे लागले. त्यानंतर तेव्हा त्याने हे ट्विट अनलाइक केले.

विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका अनिर्णित राहिली. ज्यामुळे पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानने गेल्या वर्षी मायदेशात एकही कसोटी सामना जिंकला नाही. पाकिस्तानशिवाय इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशचे संघ अंतिम शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे भारतीय संघाला याचा फायदा झाला आहे.