इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तानचे कसोटी सामने ज्या पद्धतीने पार पडले. त्यानंतर खेळपट्टीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. रावळपिंडीच्या खेळपट्टीला तर डिमेरिट पॉईंट देण्यात आला होता. त्याचबरोबर कराचीच्या खेळपट्टीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफ यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तान भारत, श्रीलंका आणि बांगलादेश सारखे टर्निंग ट्रॅक का तयार करू शकत नाही.

रावळपिंडीत इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर बरीच टीका झाली होती. या खेळपट्टीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. आयसीसीने त्याला डिमेरिट पॉइंटही दिला. त्याचवेळी कराचीतील सपाट खेळपट्ट्यांमुळे पाकिस्तानवरही बरीच टीका होत आहे. या खेळपट्ट्यांमुळे पाकिस्तानातील कसोटी सामने कंटाळवाणे होत असल्याचे अनेक दिग्गजांचे म्हणणे आहे.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा

याबाबत पाकिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफ यांना विचारले असता ते म्हणाले, ”मी मुलतानमधील खेळपट्टीबाबत क्युरेटरशी बोललो आणि त्यांनी सांगितले की पाकिस्तानमध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेसारखी माती नाही. त्यांना ३० टक्के चिकणमातीची गरज आहे, जी पाकिस्तानमध्ये नाही. पूर्वीही चेंडू खाली राहायचे आणि काही चेंडू आजच्याप्रमाणे वळायचे. कोणत्याही प्रकारे तुम्ही खेळपट्टी कशी असेल, यांचा अंदाज लावू शकत नाही.”

हेही वाचा – IND vs SL 1st T20: सॅमसनच्या खराब कामगिरीवर संतापले सुनील गावसकर; म्हणाले, ‘तो चांगला खेळाडू आहे, पण..’

पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले, न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात ४४९ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तान आपल्या पहिल्या डावात फलंदाजी करताना ११९ षटकानंतर ५ बाद ३६७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान संघ अजून ८२ धावांनी पिछाडीवर आहे. तसेच सौद शकील १०९ आणि अघा सलमान धावांवर खेळत आहे.