T20 World Cup 2026 PAK vs USA Highlights in Marathi: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. पाकिस्तानने अमेरिकेचा ३२ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह २०२४च्या टी-२० वर्ल्डकपमधील पराभवाचा पाकिस्तानने बदला घेतला. या सामन्यातून पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान व उस्मान तारिक यांनी चांगली गोलंदाजी केली. तर अमेरिकेकडून शुभम रांजणे, शायन जहांगीर व व्हॅन शाल्कविक यांनी चमकदार कामगिरी केली.
Pakistan vs United States Full Match Highlights: पाकिस्तान आणि अमेरिका टी-२० वर्ल्डकप सामन्याचे हायलाईट्स
पाकिस्तानचा अमेरिकेवर दणदणीत विजय, T20 WCमधील त्या पराभवाचा घेतला बदला; शुभम रांजणेचं अर्धशतक व्यर्थ
उस्मान तारिकच्या खात्यात सलग २ विकेट्स
उस्मान तारिकने १९व्या षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. उस्मान तारिक त्याच्या स्लिंगी अॅक्शनमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. पण यादरम्यान त्याने सामन्यात आतापर्यंत ३ विकेट्स घेतल्या आहेत.
अबरार अहमदने संजयला केलं क्लीन बोल्ड
अबरार अहमदने १७व्या षटकात संजय कृष्णमृतीला क्लीन बोल्ड करत संघाला पाचवी विकेट मिळवून दिली.
पाकिस्तानच्या खात्यात चौथी विकेट
गोलंदाजी अॅक्शनमुळे चर्चेत असलेल्या उस्मान तारिकने संघाला चौथी विकेट मिळवून दिली आहे. यासह आता अमेरिकेला विजयासाठी २६ चेंडूत ९५ धावा करायच्या आहेत.
शायन जहांगीर झेलबाद
शादाब खानने पाकिस्तानला तिसरी विकेट मिळवून दिली आहे. यासह शायन जहांगीर ४९ धावांवर झेलबाद झाल्याने त्याचं अर्धशतक हुकलं. यासह अमेरिकेने १० षटकांत ३ बाद ६९ धावा केल्या आहेत. मोहम्मद नवाज व शादाब खानच्या भेदक गोलंदाजी माऱ्यापुढे अमेरिका बॅकफूटवर गेला आहे.
अमेरिकेचा कर्णधार झेलबाद
शादाब खानने कमालीची गोलंदाजी करत पाकिस्तानला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. नवाज व शादाब यांनी मधल्या षटकांमध्ये धावांवर अंकुश ठेवत चांगली गोलंदाजी केली. यादरम्यान मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत उंच उडाला. शादाबने सोपा झेल टिपला.
अमेरिकेला पहिला धक्का
पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजने पाचव्या षटकात अमेरिकेला पहिला धक्का दिला आहे. संघाचा स्फोटक फलंदाज अँड्रियू गॉस १३ धावा करत झेलबाद झाला. यासह अमेरिकेने ५ षटकांत १ बाद ४२ धावा केल्या आहेत.
अमेरिकेला विजयासाठी इतक्या धावांचं लक्ष्य
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १९० धावा केल्या आहेत. अखेरच्या १२ चेंडूत पाकिस्तानने १७ धावा करत ५ विकेट्स गमावल्या, अन्यथा पाकिस्तानने २०० धावांचा डोंगर उभारला असता. यासह आता पाकिस्तानने विजयासाठी १९१ धावांचं आव्हान दिलं आहे.
सौरभ नेत्रावळकरच्या अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोहम्मद नवाज मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. यासह पाकिस्तानने सातवी विकेट गमावली आहे. तर तिसऱ्या चेंडूवर उस्मान खान झेलबाद झाला. तर शाहीन आफ्रिदीने एक षटकारही लगावला.
व्हॅन शाल्कविकने १९व्या षटकात शादाब खानला झेलबाद करत संघाला पाचवी विकेट मिळवून दिली. शादाब चांगले फटके खेळत असताना पाकिस्तानच्या खात्यात ही महत्त्वाची विकेट आली आहे. त्यानंतर पाकिस्तानचा गेल्या सामन्यातील हिरो फहीम अश्रफला त्याने येताच बाद करत माघारी धाडलं. यासह व्हॅन शाल्कविकने भेदक गोलंदाजी करत या सामन्यातही ४ विकेट्स घेतल्या आहेत.
शादाब खानची चौकारांची हॅटट्रिक
शादाब खानने १८व्या षटकात आदिलच्या गोलंदाजीविरूद्ध चौकारांची हॅटट्रिक लगावली आहे. यासह त्याने १८ व्या षटकात १६ धावा कुटल्या व १८ षटकांत ४ बाद १७३ धावा पाकिस्तानने केल्या आहेत. पाकिस्तानची नजर आता २०० अधिक धावांवर असेल.
हरमीतच्या खात्यात मोठी विकेट
हरमीतने १६व्या षटकातील पाचव्या चेंडूवर साहिबजादा फरहानला झेलबाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली आहे. फरहान ४१ चेंडूत ६ चौकार व ५ षटकारंसह ७३ धावा करत बाद झाला.
बाबर आझम झेलबाद
१५व्या षटकात मोहसीनने बाबर आझमला झेलबाद करवत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. बाबर ३२ चेंडूत ४७ धावांवर खेळत होता. यादरम्यान मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. यासह पाकिस्तानने १५ षटकांत ३ बाद १३७ धावा केल्या आहेत.
बाबर आझमला सूर गवसला
बाबर आझमने १३व्या षटकात हरमीत सिंगच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. धावा करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बाबरने पहिल्याच चेंडूवर षटकार झळकावला, तर त्यानंतर दोन चौकार लगावत १४ धावा केल्या. तर अखेरच्या चेंडूवर फरहानने चौकार लगावत या षटकात २१ धावा कुटल्या. यासह पाकिस्तानने १३ षटकांत २ बाद १२२ धावा केल्या आहेत.
पाकिस्तानच्या १०० धावा पूर्ण
पाकिस्तानने १२ षटकांत १०० धावांचा पल्ला गाठला आहे. बाबर धावा करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तर साहिबजादा फरहान चांगली फलंदाजी करत आहे. तर अमेरिकेच्या गोलंदाजांनीही भेदक गोलंदाजी करत धावांवर अंकुश ठेवला आहे.
साहिबजादा फरहानने अमेरिकेविरूद्ध २७ चेंडूत ४ चौकार ४ षटकारांसह अर्धशतक केलं आहे. यासह त्याने पाकिस्तानचा डाव सावरला आहे. पाकिस्तानने १० षटकांत २ बाद ८५ धावा केल्या आहेत.
पॉवरप्लेमधील अखेरच्या षटकात शाल्कविकने सईम अयुबला झेलबाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. सईम अयुब १९ धावांची खेळी करत बाद झाला. यानंतर अखेरच्या चेंडूवर त्याने कर्णधार सलमान अली आघाला झेलबाद करत संघाला अजून धक्का दिला. यासह पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये २ बाद ५६ धावा केल्या आहेत.
सौरभ नेत्रावळकरविरूद्ध षटकारांची आतिषबाजी
अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरच्या गोलंदाजीवर सईम अयुब व साहिबजादा फरहान यांनी षटकारांची आतिषबाजी केली. त्याच्या दोन्ही षटकात दोघांनी ३ षटकार लगावले आहेत. यासह संघाने ३ षटकांत बिनबाद ३२ धावा केल्या आहेत.
सामन्याला सुरूवात
पाकिस्तान आणि अमेरिका विश्वचषक सामन्याला सुरूवात झाली आहे. पाकिस्तानकडून सईम अयुब व साहिबजादा फरहान ही जोडी मैदानावर आहे, तर अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकर गोलंदाजीला सुरूवात केली.
अमेरिकेची प्लेईंग इलेव्हन
अँड्रिज गॉस (यष्टीरक्षक), शायन जहांगीर, मोनांक पटेल (कर्णधार), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, शेडली व्हॅन शाल्कविक, एहसान आदिल, सौरभ नेत्रावळकर.
पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन
सईम अयुब, साहिबजादा फरहान, सलमान आघा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान (यष्टीरक्षक), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन आफ्रिदी, उस्मान तारिक, अबरार अहमद
पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील टी-२० विश्वचषक सामन्याची नाणेफेक अमेरिकेने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यासह पाकिस्तान फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. पाकिस्तानच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये या सामन्यासाठी मोठा बदल करण्यात आला आहे. स्लिंग अॅक्शन असलेल्या उस्मान तारिकला संघात सामील केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० मालिकेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती.
अमेरिका इतिहासाची पुनरावृत्ती करणार का?
अमेरिकेने गेल्या विश्वचषकात आपल्या कामगिरीने प्रभावित केलं आणि पाकिस्तानला पराभूकत केलं होतं. हा मोठा चुरशीचा सामना झाला होता, ज्यामध्ये सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने ऐतिहासिक विजय मिळवला होता.
भारत-अमेरिका आमनेसामने
टी-२० विश्वचषक २०२६ मधील १२ वा सामना मंगळवारी (१० फेब्रुवारी) कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब येथे पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात खेळवला जात आहे. दोन्ही संघांनी ग्रुप अ मध्ये एक-एक सामना खेळला आहे. पाकिस्तानने एका चुरशीच्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला. तर अमेरिकेला भारताविरूद्ध पराभव पत्करावा लागला.

Pakistan vs USA Highlights, T20 World Cup 2026 : अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषक २०२६ मधील सामना खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने अमेरिकेवर विजय मिळवत पराभवाचा बदला घेतला आहे.
