scorecardresearch

Balochistan Police: वयाच्या १९ व्या वर्षी पाकिस्तानचा ‘हा’ वेगवान गोलंदाज डीएसपी म्हणून नियुक्त, पाहा वर्दीतील फोटो

Naseem Shah was appointed as DSP: पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाहा बलुचिस्तान पोलिसांमध्ये डीएसपी म्हणून नियुक्त झाला आहे. याबाबत त्याने स्वत: ट्विट करुन माहिती दिली. त्याने भारतीय संघाविरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होत.

Pakistan bowler Naseem Shah was appointed as DSP
नसीम शाह (फोटो-ट्विटर)

पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शाहवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बलुचिस्तान पोलिसांनी त्यांची डीएसपी म्हणून नियुक्ती केली आहे. डीएसपी झाल्यानंतर आता क्रिकेट खेळण्यासोबतच नसीम शाह देशाचे रक्षणही करणार आहे. नसीम शाहने स्वत: ट्विटरवर एक पोस्ट करुन माहिती दिली आहे. नसीम शाह फक्त १९ वर्षांचा आहे.

वास्तविक, महानिरीक्षक (आयजी) बलुचिस्तान पोलिस अब्दुल खालिक शेख यांनी क्वेट्टा येथे आयोजित एका कार्यक्रमात क्रिकेटर नसीम शाहला एजाजसह सदिच्छा दूत बनवून सन्मानित केले. डीएसपी झाल्यानंतर नसीम शाहने कार्यक्रमाच्या मंचावरून या सन्मानाबद्दल बलुचिस्तान पोलिसांचे आभार व्यक्त केले.

नसीम शाह मंचावरुन म्हणाला, ”लहानपणी मला पोलिसांची भीती वाटायची, माझे आई-वडील मला पोलिसांचे नाव घेऊन घाबरवायचे. परंतु मी मोठा झाल्यावर समजले की, आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ते किती त्याग करतात.” त्याचबरोबर नसीम शाह यांनीही एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘बलुचिस्तान पोलिसांमध्ये सदिच्छा दूत असणे ही अभिमानाची गोष्ट आहे.’

नसीम शाहची ट्विटर पोस्ट

अखेर नसीम शाह आहे कोण?

नसीम शाह हा पाकिस्तान क्रिकेट संघातील सर्वात महत्वाच्या गोलंदाजांपैकी एक आहे. त्यांच्याकडे चांगली गती आहे. टी-२० विश्वचषकात भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. या वेगवान गोलंदाजाने पाकिस्तानसाठी प्रत्येक फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने अनेक वेळा चमकदार गोलंदाजी करत पाकिस्तानला संकटातून बाहेर काढले आहे.

नसीम शाहची क्रिकेट कारकीर्द –

नसीम शाह यांनी कमी वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावले आहे. त्याने पाकिस्तानसाठी १६ कसोटीत ४२ विकेट घेतल्या आहेत. नसीम शाहने ५ एकदिवसीय सामन्यात १८ विकेट्स आणि १६ टी-२० मध्ये १४ विकेट घेतल्या आहेत. नसीम शाहने टीम इंडियाविरुद्ध पदार्पण करताना चमकदार कामगिरी केली होती. .ज्यामुळे त्याने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली होती.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 16:42 IST