Pakistan Semi Final Scenario: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात श्रीलंका आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. होम ग्राऊंडचा सपोर्ट आणि श्रीलंकेचा फॉर्म पाहता, श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण श्रीलंकेचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. न्यूझीलंडने श्रीलंकेसमोर विजयासाठी १६९ धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला १०७ धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना श्रीलंकेने ६१ धावांनी विजय मिळवला. या पराभवासह श्रीलंकेचा संघ टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान पाकिस्तानसाठी सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी समीकरण कसं असेल? जाणून घ्या.

पाकिस्तानसाठी सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी कसं आहे समीकरण?

न्यूझीलंडने श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानला अजूनही सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. इंग्लंडचा संघ सेमी फायनलमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. पुढील सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला ५० धावांनी पराभूत केलं आणि पाकिस्तानने श्रीलंकेला २२ धावांनी पराभूत केलं तर पाकिस्तानचा संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतो.

श्रीलंकेचा दारुण पराभव

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला सुरुवातीला मोठे धक्के बसले. टीम सेफर्ट अवघ्या ८ धावांवर माघारी परतला. तर फिन ॲलेन २३ धावा करून माघारी परतला. रचिन रवींद्रने ३२ धावा केल्या. ग्लेन फिलिप्स अवघ्या १८ धावा करत माघारी परतला. तर मिचेल सँटनरने शेवटी नाबाद ४७ धावा केल्या. या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ७ गडी बाद १६८ धावा केल्या.

श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी १६९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेलाही चांगली सुरुवात करता आली नव्हती. श्रीलंकेकडून कुसल मेंडीसने ३१ धावा केल्या. शेवटी वेलालागेने २९ धावा केल्या. श्रीलंकेला ८ गडी बाद १०७ धावा करता आल्या.