इंग्लंडमध्ये ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे, पाकिस्तानने आपला प्रमुख गोलंदाज मोहम्मद आमिरला विश्वचषक संघात स्थान दिलेलं नाहीये.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी आफ्रिकेचा संघ जाहीर, आमलासह अनुभवी खेळाडूंना स्थान

याव्यतिरीक्त शान मसूदच्या जागी आबीद अलीला संघात स्थान दिलं आहे. यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद संघाचं नेतृत्व करणार असून, शोएब मलिक, मोहम्मद हाफीज हे खेळाडू देखील सरफराज खानच्या दिमतीला असणार आहेत.

विश्वचषक स्पर्धेसाठी असा असेल पाकिस्तानचा संघ –

सरफराज अहमद (यष्टीरक्षक आणि कर्णधार), आबीद अली, बाबर आझम, फईम अश्रफ, फखार झमान, हारिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल-हक, जुनैद खान, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हुसैन, शोएब खान, शाहीन शहा अफ्रिदी, शोएब मलिक

अवश्य वाचा – दंड हप्त्यांमध्ये भरलेला चालेल का? पाकिस्तान हॉकीचं आंतरराष्ट्रीय संघटनेला साकडं