टी-२० वर्ल्डकप २०२४ येत्या जूनमध्ये अमेरिका-वेस्ट इंडिज इथे खेळवला जाणार आहे. यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) २८ एप्रिलला पत्रकार परिषद घेऊन आपल्या संघाच्या मर्यादित षटकांच्या आणि कसोटीसाठी दोन विदेशी मुख्य प्रशिक्षकांची नावे जाहीर केली.

पीसीबीने दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन यांची मर्यादित षटकांसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. कसोटी फॉरमॅटसाठी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीकडे ही जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय पाकिस्तान संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू अझहर महमूद दोन्ही फॉरमॅटमध्ये सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Virender Sehwag criticizes Babar Azam
VIDEO : ‘तो संघात राहण्याच्याही लायक नाही..’, वीरेंद्र सेहवाग टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर ‘या’ फलंदाजावर संतापला
Pakistan Won Huge Chance to be part of 2026 T20 World Cup
पाकिस्तानला टी-20 विश्वचषकात पुन्हा संधी! शोएब अख्तरचा ‘तो’ दावा ठरला खोटा, पण हे कसं शक्य आहे?
Ajay Jadeja Refused to Fees From Afganistan in ODI World Cup
“तुम्ही चांगलं खेळा, जिंका हीच माझी गुरुदक्षिणा”; अफगाणिस्तानच्या भारतीय मेन्टॉरने नाकारलं मानधन
IND Vs PAK T20 2024 Ind Beat Pak By 6 Runs In T20 World Cup Top 10 Memes
INDvsPAK: “बाप बाप असतो…” टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय; फॅन्स उडवतायेत पाकिस्तानची खिल्ली
Shoaib Akhtar urges pakistan to play out of your skin vs India
T20 WC 2024: “खुदा का वास्ता, जीव ओतून खेळा…” शोएब अख्तरची IND vs PAK सामन्यापूर्वी पाकिस्तानला विनवणी; VIDEO केला शेअर
Shaheen Afridi and Indian Fan new york
IND vs PAK: “चांगली बॉलिंग करू नकोस, विराट-रोहितला मित्र समज”, शाहीन आफ्रिदीला भारतीय चाहत्यांची गळ
Ind s Pak T20 WC 2024 Updates in Marathi
“…तर भारताला ‘ती’ चूक महागात पडणार”, IND vs PAK सामन्यापूर्वी कामरान अकमलचा विराटबद्दल टीम इंडियाला इशारा
After America's defeat Pakistan is being trolled
IND vs PAK : भारताविरुद्धच्या सामन्यात तरी पाकिस्तानला ‘आर्मी ट्रेनिंग’ तारणार का? सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

भारताला वर्ल्डकप जिंकवून देणारा दिग्गज पाकिस्तानचा कोच


२०११ मध्ये, जेव्हा भारतीय संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक जिंकला तेव्हा गॅरी कर्स्टन भारताच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते. कर्स्टन सध्या आयपीएलच्या १७व्या हंगामात गुजरात टायटन्स संघाच्या कोचिंग स्टाफचा एक भाग आहेत आणि आयपीएल संपल्यानंतरच पाकिस्तानी संघात सामील होणार आहेत.

कर्स्टन १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकासह आपल्या कार्यकाळाची सुरुवात करणार आहेत. पीसीबीने कर्स्टन यांना २ वर्षांसाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळण्यासोबतच गॅरी कर्स्टन यांनी दक्षिण आफ्रिका संघाच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिका पार पाडली आहे.

पीसीबीने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीची कसोटी फॉरमॅटसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. गिलेस्पीने आतापर्यंत बिग बॅश लीग, द हंड्रेड आणि काउंटीमधील संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. गिलेस्पी यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून सुरू होईल. यानंतर पाकिस्तानी संघाला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही कसोटी मालिका खेळायची आहे.