ट्रॉफीवर बिस्कीट; पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सोशल मीडियावर ट्रोल

आयसीसीनेही घेतली फिरकी

चषक अनावरणादरम्यान पाक कर्णधार सरफराज अहमद व ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरोन फिंच

ऑस्ट्रेलियाविरुद्धची २ कसोटी सामन्यांची मालिका पाकिस्तानने १-० च्या फरकाने जिंकली. सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने अबुधाबी कसोटीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या नाकीनऊ आणले. आजपासून दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु होते आहे. या मालिकेसाठी चषक अनावरणाचा सोहळा पार पडला, ज्यावरुन सध्या सोशल मीडियावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चांगलचं ट्रोल होतं आहे.

टी-२० सामन्यांच्या या मालिकेचं नाव बिस्कीट ट्रॉफी असं देण्यात आलं आहे. या मालिकेतील विजयी संघाला TUC Cup देण्यात येणार आहे. TUC ही पाकिस्तानमधील बिस्कीट उत्पादन करणारी कंपनी आहे आणि या मालिकेचे ते मुख्य प्रायोजक आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बिस्कीटाच्या आकाराची ट्रॉफी बनवण्याचा निर्णय घेतला. या ट्रॉफीचं डिझाईन पाहून आयसीसीनेही पाक बोर्डाची फिरकी घेतली.

यानंतर सोशल मीडियावरही चाहत्यांनी पाक बोर्डाला चांगलचं ट्रोल केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pakistan cricket board troll on social media by putting biscuit on trophy