ICC T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यानंतर या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे. याआधी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. पाकिस्तानकडे सेमीफायनलमध्ये जाणारा तिसरा संघ बनण्याची संधी होती. पण पाकिस्तानचा संघ श्रीलंकेला १४८ धावांवर थांबवू शकलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला असून, न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे.
या स्पर्धेतील साखळी फेरीत सर्व संघांनी दमदार कामगिरी केली आहे. पण सुपर ८ फेरीत बलाढ्य संघ संघर्ष करताना दिसून आले. दुसऱ्या गटातून इंग्लंडचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. इंग्लंडने ३ पैकी ३ सामने जिंकून ६ गुणांसह सेमीफायनमध्ये आपलं स्थान पक्क केलं. तर ३ पैकी १ सामना जिंकून ३ गुणांसह न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये स्थान मिळवणारा दुसरा संघ ठरला.
पहिल्या गटातून दक्षिण आफ्रिकेने २ पैकी २ सामने जिंकले आहेत. २ गुणांसह दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या गटात अव्वल स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट हा +२.८९० इतका आहे. तर रविवारी होणारा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ भिडणार आहेत. या सामन्यात नेट रनरेट फारसा महत्वाचा नसेल. दोन्ही संघांसाठी हा सामना उपांत्यफेरीचा सामना असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तर हा सामना गमावणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे. आता दक्षिण आफ्रिकेनंतर वेस्ट इंडिज की भारतीय संघ? कोणता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सेमीफायनल सामन्यांचं वेळापत्रक
रविवारी सुपर ८ फेरीत २ सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तर दुसऱ्या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पहिला सामना फारसा महत्वाचा नसेल. तर पण दुसरा सामना सेमीफायनलच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. त्यानंतर पहिल्या सेमीफायनलचा सामना ४ मार्चला खेळवला जाणार आहे. कोलकात्यात खेळवला जाणार आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलचा सामना ५ मार्चला वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
