Naseem Shah 2 crore fined by PCB: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहला त्याची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच महागात पडली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त पोस्टमुळे क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर कठोर दंड आकारला आहे. सुनावणीनंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २० दशलक्ष पाकिस्तानी रुपये, म्हणजेच अंदाजे ६.८ दशलक्ष रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. आपल्या वादग्रस्त पोस्टबद्दल माफी मागितली असूनही, पाकिस्तानी बोर्डाने स्टार वेगवान गोलंदाजावर ही कारवाई केली आहे.
पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूवर ठोठावण्यात आलेला हा सर्वात मोठा दंड आहे. नसीम शाहने मरियम नवाज यांना ‘लॉर्ड्सची राणी’ संबोधत एक पोस्ट केली होती. नसीम पाकिस्तान सुपर लीगमध्ये रावळपिंडी संघाकडून खेळत असून, या पोस्टनंतर त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.
पीसीबीने नसीम शाहच्या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आणि तो सोमवार, ३० मार्च रोजी समितीसमोर हजर झाला. नसीमने आपली बाजू मांडली आणि त्या घटनेबद्दल बिनशर्त माफी मागितली. त्या वादग्रस्त पोस्टनंतर, नसीम याने आपले खाते हॅक झाल्याचा दावा आधीच केला होता. असं असूनही, पीसीबीने त्याला नोटीस बजावली आणि आता, त्यांचं म्हणणं ऐकूनही, मंडळाने त्याच्यावर मोठा दंड आकारला आहे.
पीसीबीने नसीम शाहला का ठोठावला दंड?
पीसीबीने दिलेली ही मोठी शिक्षा आहे, कारण ही रक्कम नसीम शाह याच्या वार्षिक पगाराच्या निम्म्याहून अधिक आहे. पाकिस्तान बोर्डाच्या केंद्रीय करारामध्ये नसीम शाह ‘ग्रेड सी’ मध्ये आहे, ज्याअंतर्गत त्याला दरवर्षी २५ लाख पाकिस्तानी रुपये (अंदाजे ८५ लाख रुपये) पगार मिळतो. आता त्याला दंड म्हणून अंदाजे ६८ लाख रुपये भरावे लागतील. याशिवाय, नसीमने त्याच्या सोशल
पीएसएल २०२६ मध्ये सध्या ‘रावलपिंडी पिंडिझ’ या नवीन संघाकडून खेळणाऱ्या नसीम शाहने अलीकडेच एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने मरियम नवाझ यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली. मुळात, पीसीबीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट करण्यात आली होती, ज्यामध्ये मरियम नवाझ पीएसएलच्या पहिल्या सामन्यासाठी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर पोहोचल्याचे दिसत होते. नसीम शाहने पीसीबीच्या त्या पोस्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारलं की, तिला लॉर्ड्सवरील राणीसारखी वागणूक का दिली जात आहे. मीडिया सल्लागारालाही हटवलं आहे, तर पीसीबीने त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं असून आता तो कोणत्याही खेळाडूशी संपर्क साधू शकणार नाही.
पीसीबीने ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे, चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली होती, म्हणून नसीमने ही पोस्ट केली होती. मात्र, या वादानंतर नसीमने लगेचच ती पोस्ट डिलीट केली आणि आपले अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला. तथापि, पीसीबीने त्याला दुसऱ्याच दिवशी नोटीस पाठवली.
