scorecardresearch

एशिया कप २०२३ होणार रद्द? पाकिस्तानी खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला,”बीसीसीआय आणि पाकिस्तान यांच्यात…”

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे एशिया कप २०२३ रद्द होण्याची दाट शक्यता आहे.

BCCI Vs Pakistan Cricket Board
एशिया कप २०२३ होणार रद्द? (Image- Indian Express)

Asia Cup 2023 Latest News Update : पाकिस्तानचा माजी लेग स्पिनर दानिश कनेरियाने एशिया कप २०२३ बाबत मोठा दावा केला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे एशिया कप २०२३ रद्द होण्याची दाट शक्यता आहे. आता जास्त वेळ शिल्लक नाहीय. जरी टूर्नामेंटच्या तारखा जाहीर झाल्या असल्या, तरीही पूर्ण शेड्यूल अजून घोषित करण्यात आलेले नाही. याच कारणामुळे यंदाचा एशिया कप रद्द होऊ शकतो, असे कनेरियाने म्हटले आहे.

दानिश कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले, रमीज राजा जेव्हा पीसीबीचे चेअरमन होते, तेव्हा त्यांनी स्पष्टच सांगितले होते की,”जर भारताने त्यांच्या संघाला एशिया कपसाठी पाकिस्तानात पाठवले नाही, तर वनडे वर्ल्डकपसाठी पाकिस्तानलाही भारतात पाठवले जाणार नाही.” पीसीबीचे सध्याचे चेअरमन नजम सेठी यांनीही अशाच प्रकारचे विधान केले होते. त्यामुळे एशिया कपचे आयोजन होणार नाही,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नक्की वाचा – ‘IPL’चा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम काय आहे? सामना सुरू असताना संघात केव्हा बदल करू शकता? जाणून घ्या सविस्तर माहिती

एशिया कप २०२३चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले होते. मागील वर्षी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट सांगितले होते की, टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानमध्ये जाणार नाही. त्यानंतर पाकिस्तानमधून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. नजम सेठी यांना एशिया कपचे यजमानपद कोणत्याही परिस्थितीत मिस करायचे नाहीय. त्यामुळे एशियन क्रिकेट काउन्सिलच्या मीटिंगमध्ये याविषयी अनेकदा चर्चा करण्यात आली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 18:15 IST

संबंधित बातम्या