२४ ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. विश्वचषकापूर्वीही दोन्ही देशांचे चाहते आणि क्रिकेटपंडित हे सोशल मीडियावर वादविवाद करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) त्यांच्या वर्ल्डकप जर्सीबाबत केलेल्या एका गोष्टींमुळे चर्चेत आला होता. व्हायरल झालेल्या जर्सीच्या फोटोंमध्ये पाकिस्तानने भारताऐवजी यूएईचे नाव लिहिले होते.

यंदाचा टी-२० वर्ल्डकप भारतात होत नसला, तरी बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करत आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, आयसीसी स्पर्धेतील सर्व संघांना त्यांच्या जर्सीवर उजव्या बाजूला यजमान देशाचे नाव आणि वर्षासह स्पर्धेचे नाव लिहिणे अनिवार्य आहे. मात्र आता पाकिस्तानने भारताच्या नावासोबत वर्ल्डकपसाठी नवी जर्सी लाँच केली आहे.

Pakistani Women Viral Video
आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या तरुणींनी केली कबाबची चोरी; दुकानदाराने मग केले असे काही की…, पाहा Video
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
PNS Siddique naval base under attack
चीनची गुंतवणूक असलेल्या पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला; या आठवड्यातली दुसरी घटना
Who are Majeed Brigade
माजीद ब्रिगेड कोण आहे? पाकिस्तानातल्या ग्वादर बंदरावर का केलं आक्रमण?

हेही वाचा – T20 WC : टीम इंडियाच्या सराव सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे पाहायचे सामने

टी-२० विश्वचषक आधी भारतात खेळला जाणार होता, परंतु भारतात करोना महामारीमुळे, बीसीसीआय आणि आयसीसीने परस्पर संमतीनंतर हे ठिकाण ओमान आणि यूएईला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघ भारतासह दुसऱ्या गटामध्ये आहे. या गटात भारताशिवाय अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ देखील सहभागी आहेत. पाकिस्तानने २००९ मध्ये टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली, तर २००७ मध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचला होता.