कराची : मॅट हेन्री (नाबाद ६८ धावा) आणि एजाज पटेल (३५) या अखेरच्या जोडीने केलेल्या शतकी भागीदारीमुळे न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात ४४९ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानची ३ बाद १५४ अशी स्थिती होती. ते २९५ धावांनी पिछाडीवर आहेत.

कराची येथे होत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी ६ बाद ३०९ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. नसीम शाहने इश सोधीला (११) खेळपट्टीवर फार काळ टिकू दिले नाही. टॉम ब्लंडेलने (१०८ चेंडूंत ५१) अर्धशतक पूर्ण केले, पण त्यानंतर त्याला फिरकीपटू अब्रार अहमदने माघारी पाठवले. अब्रारनेच कर्णधार टीम साऊदीलाही (१०) बाद केले. त्यामुळे न्यूझीलंडची ९ बाद ३४५ अशी धावसंख्या झाली होती. मग हेन्री आणि एजाज या न्यूझीलंडच्या अखेरच्या जोडीने २४ षटके खेळून काढताना १०४ धावांची भागीदारी रचली. हेन्रीने कसोटी कारकीर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावताना ८१ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ६८ धावांची खेळी केली. अखेर अब्रारने एजाजला बाद करत ही जोडी फोडली.

Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Virat Reveals Time Spent With Family
IPL 2024 : ‘लोक आम्हाला ओळखत नव्हते’, विराट कोहली दोन महिने कुठे होता? स्वत:च उघड केले गुपित
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: चार दिवसांपूर्वी स्ट्रेचरवर, आज चेन्नईचा हिरो; मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर आरसीबीने टेकले गुडघे

त्यानंतर पाकिस्तानच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. हेन्रीने अब्दुल्ला शफिक (१९), एजाजने शान मसूदला (२०) माघारी धाडले. इमाम-उल-हक (नाबाद ७४) आणि कर्णधार बाबर आझम (२४) यांनी पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु बाबर धावचीत झाल्याने पाकिस्तानचा संघ पुन्हा अडचणीत सापडला.