इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांसाठी भारताच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी इंग्लंड संघ हैदराबाद इथे दाखल झाला. पाकिस्तानी वंशाचा फिरकीपटू 20वर्षीय शोएब बशीरला भारताचा व्हिसा मिळू शकला नाही. व्हिसा प्रक्रिया लांबल्याने शोएब मायदेशी परतला आहे. भारत दौऱ्यासाठी तयारी म्हणून इंग्लंडचा संघ अबू धाबीत सराव करत होता. तिथूनच इंग्लंडचा संघ भारतात दाखल झाला. पण व्हिसाचं काम न झाल्याने शोएब खोळंबला. व्हिसाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने शोएब अखेर मायदेशी परतला आहे.

शोएब मंगळवारी हैदराबाद इथे दाखल होईल अशी अपेक्षा होती. पण व्हिसा प्रक्रिया लांबल्याने त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. आता इंग्लंडमध्ये शोएब भारतासाठीच्या व्हिसासाठी प्रक्रिया सुरू करेल.

Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
IPL 2024 CSK Bowler Mustafizur Rahman Return to Bangladesh to Sort visa issue for T20 World Cup
IPL 2024: चेन्नईचा मुस्तफिजुर रहमान आयपीएल सुरू असतानाच अचानक मायदेशी का परतला? काय आहे कारण
Shikhar Virat Meet Video
IPL 2024 : पंजाबविरुद्धच्या विजयानंतर विराटने नाराज शिखरला मारली मिठी, VIDEO होतोय व्हायरल

शोएबचा जन्म इंग्लंडमधल्या सरे प्रांतात झाला आहे आणि त्याच्याकडे इंग्लंडचा पासपोर्ट आहे. शोएबचे आईवडील पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानची पार्श्वभूमी असणाऱ्या नागरिकांना भारतात प्रवेशासाठी व्हिसा मिळताना अडचण निर्माण होते. शोएबने वयोगट स्पर्धा सरे संघाकडून खेळल्या. त्यानंतर तो सॉमरसेट संघासाठी खेळू लागला. ६ प्रथम श्रेणी सामन्यात त्याने १० विकेट्स पटकावल्या आहेत. सरे इथे सिद्धार्थ लाहिरी यांच्या रॉयल्स अकादमीत शोएबने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजालाही उशिराने व्हिसा मिळाला होता. उस्मान ऑस्ट्रेलियाकडून खेळत असला तरी त्याचा जन्म पाकिस्तानातल्या इस्लामाबाद इथे झाला आहे. पाकिस्तान संघाला वर्ल्डकपसाठी भारतात यायचं होतं. त्यावेळी त्यांनाही अगदी शेवटच्या क्षणी व्हिसा मिळाला. या गोंधळामुळे त्यांनी दुबईत आयोजित सराव शिबीर रद्द केलं.

११ डिसेंबर रोजी भारत दौऱ्यासाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा झाली. त्यात शोएबचा समावेश होता. बशीर, अन्य संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी व्हिसा अर्ज दाखल करण्यात आले. या संघात पाकिस्तानी वंशाचा रेहान अहमदही आहे. मात्र त्याला व्हिसा मिळाला. वर्ल्डकप काळातही रेहान राखीव खेळाडूंमध्ये होता.

इंग्लंडमध्ये कागदपत्रांची पूर्तता होऊन शोएब भारतात येईल असा विश्वास चाहत्यांना आहे पण जो गोंधळ झाला त्याने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स नाराज झाला आहे. स्टोक्स म्हणाला, कर्णधार म्हणून मला त्याच्यासाठी खूपच वाईट वाटत आहे. आम्ही डिसेंबरच्या मध्यातच संघाची घोषणा झाली. पुरेसा वेळ होता. व्हिसा न मिळाल्यामुळे शोएबला मायदेशी परतावं लागलं आहे. इंग्लंड संघात त्याला प्रथमच संधी मिळाली होती. तो अनुभव असा असू नये असं मला वाटतं. त्याच्यासाठी हा खास दौरा आहे. लवकरच त्याला व्हिसा मिळून तो इथे असेल.

पण व्हिसाची अडचण निर्माण होणारा तो पहिलाच खेळाडू नाहीये. आम्ही त्याची संघात निवड केली आणि केवळ व्हिसाच्या कारणांमुळे तो इथे नाहीये. त्याच्यासारख्या तरुण मुलाला असा अनुभव यायला नको होता. अनेक पातळ्यांवर त्याच्या व्हिसासाठी प्रयत्न सुरू आहेत.

इंग्लंड लायन्स संघासाठी शोएबने चांगली कामगिरी केली. त्यामुळे भारत दौऱ्यासाठी त्याच्या नावाचा विचार झाला. सहा फूटांपेक्षा जास्त उंचीचा फिरकीपटू संघात असणं केव्हाही फायदेशीर ठरु शकतं हे निवडसमितीने जाणलं. युएईत आयोजित सराव शिबिरातही शोएबने चांगली गोलंदाजी केली. हैदराबाद कसोटीत त्याला पदार्पणाची संधी देण्याबाबत इंग्लंड संघव्यवस्थापन विचार करत होतं पण व्हिसाच्या अनुपलब्धतेमुळे ते स्वप्न लांबणीवर पडलं आहे.