Pakistan Cricketer Bold Statement on Jasprit Bumrah: सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाेत्कृष्ट गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहकडे पाहिलं जातं. जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघासाठी अनेक सामने फिरवले आहेत. बुमराहचा सामना करणे फलंदाजांसाठी सोपी गोष्ट नसते. बुमराहमध्ये एकट्याने सामन्याचा रोख बदलण्याची ताकद आहे आणि त्याने टीम इंडियासाठी अनेकदा अशी कामगिरी केली आहे. टी-२० विश्वचषकातील बऱ्याचशा सामन्यात बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाच्या बाजूने सामना वळवला आहे. यादरम्यान आता बुमराहपेक्षा नसीम शाह चांगला गोलंदाज असल्याचे वक्तव्य पाकिस्तानच्या एका वेगवान गोलंदाजाने केले आहे. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर या पाकिस्तानी क्रिकेटरला चांगलंच सुनावलं आहे.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज इहसानुल्लाहने धक्कादायक विधान केले असून त्यासा सोशल मीडियावर चाहत्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. या पाकिस्तानी गोलंदाजाने त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज नसीम शाह हा भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहपेक्षा उत्कृष्ट असल्याचे सांगितले आहे. एका पॉडकास्टमध्ये, इहसानुल्ला पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाला, ठआपण जर पाहिलं तर बुमराहपेक्षा नसीम शाह चांगला गोलंदाज आहे.” पुढे हा पाकिस्तानचा खेळाडू म्हणाला, “नसीम शाहनेही २०२२ च्या विश्वचषकात चांगली कामगिरी केली. एखाद वर्ष असं येतं की खेळाडू खराब फॉर्मातून जात आहे. पण तरीही नसीम शाह त्याच्यापेक्षा चांगला गोलंदाज आहे.”

हेही वाचा – IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने डिवचलं, अभिषेक शर्माकडून चोख प्रत्युत्तर, पाहा VIDEO

पाकिस्तानी गोलंदाजाच्या या वक्तव्यानंतर चाहते सोशल मीडियावर इहसानुल्लाची चांगलीच फिरकी घेत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, इहसानुल्लाच्या मते, पाकिस्तानची अर्थव्यवस्था अमेरिकेपेक्षा मोठी आहे.

बुमराहपेक्षा नसीम शाह हा चांगला गोलंदाज आहे, असं वक्तव्य याआधीही पाकिस्तानी खेळाडूंनी केलं आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबार आझमनेही असेच उत्तर दिले होते. एका पोडकास्टमध्ये जेव्हा बाबरला विचारलं की टी-२० सामन्यातील रोमांचक वळणावर असेल आणि अखेरच्या षटकात १० धावा जर वाचवायच्या असतील तर कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवत गोलंदाजीला संधी देशील, यावर थोडाही वेळ न घालवता बाबरने नसीम शाह असे उत्तर दिले होते.

हेही वाचा – IND vs NZ: “पण आम्हाला ही अपेक्षा नव्हती…”, भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?

बुमराहच्या गोलंदाजीचे आकडेच या वक्तव्यावर चोख प्रत्युत्तर आहे. जसप्रीत बुमराह हा टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज होता, ज्याने १५ विकेट्स घेतले होते. याचबरोबर बुमराहला या वर्ल्डकपमधील सर्वाेत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडले गेले. टी-२० विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकाविरूद्धच्या सामन्यात बुमराहने घेतलेले दोन विकेट आणि त्याची उत्कृष्ट स्पेल भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारी होती.

Story img Loader